मुंबईकरांच्या मतांसाठी भाजपची शक्कल लढवली आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकलने प्रवास केला आहे. तेजस्वी सूर्या यांनी मुंबईकरांसोबत लोकल प्रवासामध्ये संवाद साधला आहे. तेजिंदरसिंह तिवानांकडून लोकलमध्ये प्रचार करण्यात आला. भाजपला मतदान करण्याचे लोकलमधील प्रवाशांना आवाहन करण्यात आले.
उल्हासनगर मध्ये आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार होते, महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं,या सभेसाठी दुपारी दोन वाजता पासूनच नागरिकांनी गर्दी केली होती, अखेर काही तांत्रिक कारण देत सभा रद्द करण्यात आली, तेव्हा स्टेजवर असलेल्या मान्यवरांचे भाषण न ऐकता नागरिक निघून गेलेत.
अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. फडणवीसांनी सुरु केलेली विकासकामं मविआने रोखली असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे. मोदींमुळे पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राईक करता आला असल्याचं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. तसेच मोदींनी दहशतवाद जवळपास संपवला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने व्होटबँकसाठी दहशतवाद रोखला नसल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.
राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी 4 जाहीर सभा घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे. पालघरच्या कोलवडे पोलीस परेड ग्राउंडवरील हेलिपॅडवर बॅग तपासली. पालघरच्या हेलिपॅडवर उतरताच मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बॅगांची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून मुख्यमंत्र्यां च्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली आहे. नांदेडच्या मुखेड येथे फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार तुषार राठोड आणि लोकसभेचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे.