लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: 'संविधान बदलायचं होतं, म्हणून '400 पार'चा नारा', शरद पवारांचा आरोप

Team Lokshahi

जम्मू काश्मिरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू काश्मिरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. चकमकीत एक जवान शहीद तर तीन जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मिरच्या किश्तवाडमध्ये 15 तासांत तिसऱ्यांदा चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोल्हापुरात मोठी कारवाई

कोल्हापुरात दारूसह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.

अकबरुद्दीन ओवैसींची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका

ना खाऊंगा ना खाने दुंगा बोलणाऱ्यांनी हजारो कोटी खाल्ले", अकबरुद्दीन ओवैसींची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. भिवंडीतील प्रचार सभेदरम्यान भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजप खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाकडून नोटीस

राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला आहे. धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला आहे. 2023 चे कलम 179 अन्वेय आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

'संविधान बदलायचं होतं, म्हणून '400 पार'चा नारा', शरद पवारांचा आरोप

'संविधान बदलायचं होतं, म्हणून '400 पार'चा नारा' दिला असल्याचा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केला आहे. संविधानाच्या रक्षणासाठी 'इंडिया'ची स्थापना केल्याचे शरद पवार यांनी विधान केलं आहे.

अजित पवार सोमवारी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

अजित पवार उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. नवापूर मतदार संघातील खांडबारा येथे अजित पवारांची जाहीर सभा होणार आहे. भरत माणिकराव गावित यांच्या प्रचारार्थ खांडबारामध्ये जाहीर सभा भरणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे. चौघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. अमित शाहांकडून महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या अशा अमित शाह यांनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत पोलीस आणि भरारी पथकाची मोठी कारवाई

मुंबईत पोलीस आणि भरारी पथकाची मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या विक्रोळीत साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. विक्रोळीत कॅश व्हॅनमधून चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत.

दहिसर मतदारसंघात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

दहिसर मतदारसंघात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. भाजपच्या मनीषा चौधरी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. दहिसरमधील अंबावाडीत भाजपच्या प्रचार रॅलीदरम्यान राडा झाला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला आहे.

जम्मू-काश्मीरच्या चकमकीत सुरक्षा दलाचे जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या झाबरवानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी दरम्यान हल्ल्यात सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहे. तर दहशतवाद्यांच्या अस्तित्वाबाबत विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे श्रीनगरमधील झाबरवान जंगल परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलांमध्ये संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे.

उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

उल्हासनगर मध्ये एका ट्रक चालकाने दुचाकी स्वारला जबर धडक दिली, या ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून कॅम्प चार मधील भाटिया चौक पाच दुकान परिसरात ही घटना घडली आहे. तर दुचाकीच मोठ नुकसान झालं असून यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

'मविआला चांगल्या शिक्षकाची गरज' सुधीर मुनगंटीवारांचा मविआवर हल्लाबोल

महाविकास आघाडीला अल्झायमर झाला असून त्यांना चांगल्या शिक्षकाची गरज आहे. ज्या गोष्टी त्यांच्या कार्यकक्षेत नाही, त्या घोषणा मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरनाम्यात केल्याची टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'माझा बुथ, सर्वात मजबूत' अभियान

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजाची गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ