आरसीबी अणि केकेआर लिलावा दरम्यान व्यंकटेश अय्यरला केकेआरने 23 कोटी 75 लाखांसह संघात कायम ठेवले आहे.
रविचंद्रन अश्विन एक भारतीय उजवा फिरकी गोलंदाज आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत रंगली होती. या लिलावात आर अश्विनला 9 कोटी 75 कोटींनी करारबद्ध केले आहे.
हर्षल पटेलसाठी गुजरात आणि हैद्राबाद या दोन संघांमध्ये लिलाव रंगलेला पाहायला मिळाला. हर्षल पटेलला 6 लाख 75 लाखांसह हैद्राबाद संघाने सामील केले आहे.
राहुल त्रिपाठीला चेन्नईने 3 कोटी 4 लाखात ताफ्यात करारबद्ध केले आहे.
लखनौ सुपर जायंट्स संघाचा माजी कर्णधार केएल राहूल दिल्ली कॅपिटल्सकडून 14 कोटींमध्ये करारबद्ध करण्यात आला आहे. आता तो केएल राहूल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार.
लियाम लिव्हिंगस्टोनसाठी रॉयल चॅंलेंजर्स बंगळूरू संघाकडून 8 कोटी 75 लाखांची बोली लावण्यात आली.
आरसीबी संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला 12 कोटी 25 लाखांसह गुजरात टायटन्स संघाने आपल्या संघात घेतले आहे.
फिरकीपटू युझवेंद्र चहलवर पंजाब किंग्ज संघाकडून 18 कोटींची सर्वोत्तम बोली लावण्यात आली असून तो आता पंजाब किंग्जसाठी खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर 7 कोटी 50 लाखांसह लखनौ सुपर जायंट्स संघामध्ये गेला.
पहिल्या सत्रातील लिलावात विकला गेलेला खेळाडू अर्शदीप सिंग - १८ कोटी (पंजाब किंग्ज ) RTM
कगिसो रबाडा - १०.७५ कोटी( गुजरात टायटन्स)
श्रेयस अय्यर -२६.७५ कोटी (पंजाब किंग्ज)
जोस बटलर -१५.७५ कोटी (गुजरात टायटन्स)
मिचेल स्टार्क - ११.७५ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स)
पहिल्या सत्रातील सर्वात मोठी बोली रिषभ पंत - २७ कोटी (लखनऊ सुपरजायंट्स)
मोहम्मद शमी हैदराबादकडून खेळणार असून सनरायझर्स हैदराबादने मोहम्मद शमीला 10 कोटीला विकत घेतलं आहे.
ऋषभ पंतसाठी LSG आणि RCB 10 कोटींची लढत सुरु होती. दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी कर्णधार ऋषभ पंत याला २७ कोटीला लखनौ सुपर जायंट्स संघाने विकत घेतलं.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी KKR आणि DC मध्ये लढत सुरु होती. मिचेल स्टार्क हा मागील हंगामात सर्वात महागडा खेळाडू होता तर आता 11 कोटी 75 लाखांच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात सामिल करुन घेतल आहे.
गुजरात टायटन्सने जॉस बटलरला १५ कोटी ७५ लाखांना संघात घेतल आहे. तर पुढे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी KKR आणि DC मध्ये लढत आहे.
श्रेयस अय्यरने आयपीएलची आतापर्यंतची सर्वात मोठी बोली मिळाली आहे. पंजाब किंग्सने 26.75 कोटीला श्रेयस अय्यरला विकत घेतल आहे. पुढे जोस बटलर आहे आणि त्याची मूळ किंमत 2 कोटी आहे.
दुसऱ्या बोलीत दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा याला गुजरात टायटन्सने या गोलंदाजाला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची किंमत 2 कोटी रुपये होती.
भारतीय खेळाडू अर्शदीप सिंगवर पहिली बोली लावली गेली असून अर्शदीप सिंग या खेळाडूसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत पाहायला मिळत होती पण पंजाब किंग्सने राईट टू मॅच या कार्डचा वापर करून अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांना खरेदी केले.
पहिले सत्र दुपारी 3:00 ते 5:00
संध्याकाळी 5:00 ते 5:45 लंच ब्रेक
दुसरे सत्र संध्याकाळी 5:45 ते रात्री 10:30
1) पंजाब किंग्स - पर्स 110.5 कोटी
2) सनरायझर्स हैदराबाद - पर्स 45 कोटी
3) मुंबई इंडियन्स - पर्स 45 कोटी
4) दिल्ली कॅपिटल्स - पर्स 73 कोटी
5) लखनऊ सुपर जायंट्स - पर्स 69 कोटी
6) राजस्थान रॉयल्स - पर्स 41 कोटी
7) गुजरात टायटन्स - पर्स 69 कोटी
8) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पर्स 83 कोटी
9) चेन्नई सुपर किंग्स - पर्स 65 कोटी
10) कोलकाता नाईट रायडर्स - पर्स 51 कोटी
आयपीएल 2025 च्या लिलावात आज खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. एकूण 577 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात 82 खेळाडूंनी अव्वल स्तरावर नोंदणी केली जाणार आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. तर 27 खेळाडूंची दुसरी किंमत 1.50 कोटी आहे. त्याचसोबत 18 खेळाडूंची किंमत 1.25 कोटी आहे आणि 23 खेळाडूंची किंमत 1 कोटी अशा राखीव किंमतीसह यादी करण्यात आली असून उरलेल्या खेळाडूंना 30 लाख ते 75 लाखापर्यंत वर्गीकृत केले आहे. यादरम्यान सर्वात महागडा खेळाडू किती पैसे घरी घेऊन जाणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.