राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी व्यासपीठावर जाण्याचे टाळले. जाहीर सभेसाठी आलेले मनसैनिक बसलेले त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. माझी प्रकृती ठीक नसल्याने मी पुढे सुद्धा अशाच पद्धतीने फक्त भेटी घेण्यासाठी जाणार आहे. पुढच्या जाहीर सभेमध्ये मी भाषण करणार नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. पंतप्रधान देवघरहून दिल्लीला येत होते. तांत्रिक बिघाडामुळे पंतप्रधानांचं विमान उडण्यात अडथळा आला आहे. तांत्रिक बिघाडामुळे पंतप्रधान झारखंडमध्ये अडकले आहेत.
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने वेळात बदल केलेला आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आपल्या फेऱ्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे. पालिका आणि इतर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोच्या फेऱ्या पहाटे लवकर ते मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु राहणार आहेत.
वांद्रे कुर्ला संकुल(BKC) मेट्रो स्टेशनच्या बाहेर आग लागली आहे. आग लागल्यानंतर बीकेसी मेट्रो स्टेशन तात्पुरते बंद करण्यात आलं आहे. मेट्रो स्टेशनसमोरील आयकर कार्यालयाजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आग पसरल्याची माहिती मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे.