देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार असल्याचं कळतंय. राज्यपालांकडे CMपदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत. तसेच शपथविधी पार पडेपर्यंत शिंदे राहणार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वरळी अपघात प्रकरणी आरोपींना दिलासा नाहीच. मिहीरची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. मिहीरसह चालकाची अटक कायदेशीर असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून पेच कायम आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप अनुकूल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं यावर शिंदे ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाकडून रश्मी शुक्लांना पदाभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आचारसंहिता संपताच रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला आजच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे. विजयी आमदारांच्या बैठकीनंतर दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर उमेदवारांची बैठक होणार आहे. पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांकडे CM पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे. शपथविधी पार पडेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे.