ब्लॉग

थप्पड…

Published by : left

नरेंद्र कोठेकर | जगभरातील सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 94 वा ऑस्कर 2022 (oscars 2022 winners) सोहळा रविवारी मध्यरात्री पार पडला. देशविदेशातील बहुभाषिक चित्रपटांची या पुरस्कारासाठी निवड होत असल्याने या सोहळ्याबाबत नेहमीच करोडो प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचलेली असते… प्रतिवर्षी हा सोहळा पुरस्कार वितरणाआधी आणि नंतर चर्चेत असतोच… यावर्षी हा सोहळा एका वेगळ्याच घटनेने चर्चेत आला आणि ती चर्चा आता वर्षानुवर्षे होत राहिल… सोहळ्याचे सूत्रसंचालन हॉलिवूड विनोदी अभिनेता क्रिस रॉक (Will Smith Slapped Chris Roc during the Oscars) याने अभिनेता विल स्मिथ याची पत्नी जाडा पिंकेटवर (Jada Pinkett) विनोद केला. जाडा गेल्या काही दिवसांपासून केसांच्या विकाराने त्रस्त आहे… साहजिकच तिच्या केसांवर केलेला विनोद स्मिथला आवडला नाही… त्याने थेट व्यासपीठावर जावून रॉकच्या कानशिलात वाजवत आपला संताप व्यक्त केला आणि पुन्हा स्वतःच्या जागेवर येवून तो बसला.. झाल्या प्रकाराने उपस्थित सगळेच अचंबित झाले… हा अघटीत प्रकार होता की तशी स्क्रिप्ट तयार करण्यात आली होती, याचा सुरूवातीला कोणालच उलगडा झाला नाही… मात्र नंतर स्मिथने त्याला अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्यावर उपस्थितांना घटनेचं गांभिर्य समजलं… प्रतिष्ठेच्या सोहळ्यात असे घडणे साहजिकच अनपेक्षित होतं… मात्र जे घडायचं होतं ते घडलं… आता जोवर हा सोहळा होत राहिल तेव्हा तेव्हा याची चर्चा नक्कीच होईल… यात एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपण कोणावर आणि कोणत्या प्रकारचा विनोद करतोय याचे तारतम्य सादरीकरण करणाऱ्यांनी बाळगायला हवंय… विनोद करताना कोणाच्याही दुखऱ्या नस वा व्यंगावर बोट ठेवू नये… आपला विनोद समोरील माणसांनी वा प्रेक्षकांनी स्विकारावा अशी अपेक्षाही कधी बाळगू नये… सिनेसृष्टीत असे अनेक किस्से आणि त्या किस्स्यांना आधारीत गॉसिप घडत असतात.. पण ते अनेकदा आपल्या नजरेआड असल्याने त्याला तितके महत्व उरत नाही… पण हा सोहळा जगभरातील करोडो लोक लाईव्ह पाहत असल्याने त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली… सिनेसृष्टीशी निगडित असाच एक प्रकार 2007 साली घडला होता.. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गीर यांने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मिठी मारून तिचे दीर्घ चुंबन घेतले होते.. त्यावेळीही व्यासपीठावर झालेल्या याप्रकाराने उपस्थित अचंबित झाले होते.. याप्रकरणी न्यायालयात काहींनी याचिका दाखल करत हे असभ्यतेचे लक्षण असल्याचा दावा केला होता… हा खटला साधारणतः 11 वर्षे सुरू राहिला होता… त्यांनत एखा घटनेत एका वृत्तवाहिनेवर सुरू असलेल्या राजकीय चर्चेत भाजपा प्रदेश सरचिटणीस एस विष्णू वर्धन रेड्डी यांनी अमरावती संवर्धन समितीचे सदस्य के श्रीनिवास राव यांनी रेड्डी यांना चप्पल फेकून मारली…लाईव्हमध्ये झालेल्या या प्रकाराने सगळेच अँकरसह सगळेच अचंबित झाले होते.. शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना दिल्लीतील एनडीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथून बाहेर निघताना अरविंदर नावाच्या एका माथेफिरूने अचानक हल्ला करत पवार यांच्या श्रीमुखात लगावली होती. राजकीय नेते सगळेच चोर आहेत.. असा दावा करत त्यांने पवारांच्या कानशिलात लगावली होती.. या घटनेने पवारांचे सुरक्षा रक्षकदेखील अवाक् झाले होते… पोलिसांनी त्याला नंतर अटक केली. मात्र या घटनेचे देशबरात पडसाद उमटले होते… पवारांनी संबंधित आरोपीवर कारवाई न करण्याच्या सूचना त्यावेळी दिल्या होत्या… अशा अचानक घटनाऱ्या घटनांची नेहमीच मोठी चर्चा होत असते… उपरोक्त घटनांचे काहीही साधर्म्य नाही.. मात्र अशा घटना कायम स्मरणात राहतात… मध्यंतरी 'थप्पड' नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता.. त्यात नवरा बायकोच्या कानशिलात लगावतो… याचा राग मनात ठेवून बायको नवऱ्याला घटस्फोट देते… यात स्त्रीत्वाचा दडलेला इगो होता.. नवरा हा घराचा सर्वेसर्वा असतो म्हणून त्याला बायकोला मारण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा अत्यंत उपयुक्त संदेश यानिमित्ताने निर्मात्यांनी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता… आपण समाजात वावरत असताना आपल्या मर्यांदांचे आणि अधिकाराचे भान ठेवणे अनिवार्य असते… आपल्याला त्याचा एकदा विसर पडला की आपण आपल्याला श्रेष्ठ समजायला लागतो आणि त्यातून जन्माला आलेल्या आत्मविश्वास आपलाच घात करतो… आजच्या ऑस्कर सोहळ्यात हाच अति आत्मविश्वास मारक ठरला आहे.. विनोदी अभिनेता क्रिस रॉक याने सूत्र साचालन करताना भान ठेवले असते तर ती घटना घडलीच नसती… अभिनेता विल स्मिथ याने केलेल्या कृतीचे कोणीही समर्थन करणार नाही.. कारण रॉक याने विनोद केला असला तीर त्याला जाहिररित्या मारहाण करणे हे न पटणारे आहे.. नंतर स्मिथने झाल्या प्रकारबद्दल सर्वांसमक्ष दिलगिरी व्यक्त केलीय… आपण कोणाच्या व्यंगावर वा आजारावर टिप्पणी करतोय ती निषेधार्ह आहे… रॉक याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला जेथल्या तेथे मिळाली असली तरी गेल्या 93 वर्षाच्या ऑस्कर सोहळ्याच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले हे नाकारता येणार नाही.. यानिमित्ताने आपली वडिलधारी माणसे सांगयाची ते तंतोतंत पटते… "मस्करीची कुस्करी' होणार नाही याचे तारतम्य आपणच बाळगायला हवंय…

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने