दरवर्षी वट पौर्णिमा (Vat Purnima) ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जातो. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. यंदा हा सण 14 जून 2022 ला साजरा केला जाणार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा अशा तीन दिवसांचे हे व्रत केले जाते. वटवृक्षामध्ये त्रिदेव निवास करत असतात म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश राहतात. तसेच वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीमाता प्रसन्न होते.
नववधूंमध्ये वटपौर्णिमा या सणाचा विशेष उत्साह पाहायला मिळणार आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी महिला साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य जीवनामध्ये सुख आणि संपत्ती प्राप्त होते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे, यासाठी वटवृक्षाची पुजा केली जाते.
वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या स्त्रिया सकाळी आंघोळ करून साजशृंगारात तयार होऊन वटवृक्षाजवळ जातात. वटवृक्षाभोवती कच्चा कापूस गुंडाळून, जल अर्पण करून, हळद, कुंकू या वटवृक्षाला चंदन लावून ती विधीप्रमाणे पूजा करतात. त्यानंतर त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
अशी करा पूजा
वडाच्या झाडाला तिहेरी दोरा बांधला जातो. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळद कुकुं अक्षता वाहुन पंचोपचार पूजा केली जाते. त्यानंतर सती मातेच्या सुपारीचीपण पंचोपचार पूजन करावे. वडाच्या मूळाजवळ पुरुष सुक्तासह षोडशोपचार अभिषेक करून चोपचार पूजन व् आरती करावी.
हे आहेत मुर्हूत
वट पौर्णिमा सोमवारी रात्री १३ जूनला ९ वाजून २ मिनिटांनी सुरू होणार असून १४ जूनला संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत वटपौर्णिमा साजरी करता येणार आहे. १४ जून रोजी सकाळी ११ ते १२.१५ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे 14 जूनच्या सकाळी महिला वटपौर्णिमेचा पूजा विधी साजरा करू शकणार आहेत.