ब्लॉग

सासरच्या नातेवाईंकांमुळे अडचणीत आलेले उद्धव ठाकरे तिसरे मुख्यमंत्री

Published by : Team Lokshahi

कल्याणी दीक्षित
राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा धडाका पाहायला मिळतोय..महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांच्या मागे तपासाचा ससेमिरा लागलेला असताना आता मुख्यमंत्र्यांनाच दणका बसलाय…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे अर्थात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे (Rashmi Thackeray) बंधू श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) आता ईडीच्या (ED) रडारवर आहेत. परंतु यापुर्वी अन्य दोन मुख्यमंत्री सासरच्या नातेवाईकांमुळे अडचणीत आले होते. त्यातील दोन मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर धाड टाकल्यानं राज्यात खळबळ माजली आहे. पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. जवळपास ६ कोटी ४५ लाख इतकी मालमत्ता ईडीनं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईनंतर सरकारवर टिकेची झोड उठवली जात असताना, आरोप-प्रत्यारोपांची राळही पाहायला मिळतीये. या सदनिका मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याकडे कश्या आल्या, यात पैशांची अफरातफर झालीये का, मुख्यमंत्री आता काय पाऊल उचलणार असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात असताना भाजपाचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) ट्विट करत थेट मुख्यमंत्र्यांच्या CM राजीनाम्याची मागणी केलीये.

नितेश राणे ट्विटमध्ये म्हणतात..
इतिहास सांगतो, मनोहर जोशींना (Manohar Joshi) त्यांच्या जावयावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हाच नियम इथे लागू होतो का? की शिवसैनिकाचे (ShivSena) नियम वेगळे आहेत?", असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
आता थोडसं मागे जाऊन मनोहर जोशींनी का राजीनामा दिला होता, त्यावेळी काय घडलं होतं पाहुयात
1995-99 या काळात शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते…जवळपास चार वर्ष पदावर असल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) त्यांना अचानकपणे राजीनामा द्यायला सांगितलं, आणि त्याजागी नारायण राणेंची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
अचानक राजीनामा मागितला जाणार याची मनोहर जोशींना काहीचं कल्पना नव्हती. त्याचवेळी राज्याच्या राजकारणात मनोहर जोशींच्या जावयांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते..

काय होते गिरीश व्यास यांचे प्रकरण?
मनोहर जोशींचे जावई गिरीश व्यास याच्ंयावर त्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. गिरीश व्यास (Girish Vyas) हे बांधकाम व्यावसायिक होते. त्यांच्या कामात घोटाळे आणि अनियमिततेचे आरोप झाले होते. शाळेसाठी आरक्षित असलेल्या पुण्याच्या प्रभात रोडवरील भूखंडावर टोलेजंग इमारत उभारली होती. पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रमाकांत झा (Ramakant Jha) यांनी शाळेसाठीचे आरक्षण उठवले आणि शाळेसाठी आधी लोहगाव, मग मुंढव्यातली जागा देण्यात आली. शाळेचं आरक्षण हलवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच व्यासांनी दहा मजली सन ड्यू बिल्डिंग उभारली. या भूखंडांवरील शाळेचे आरक्षण बदलण्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आवाज उठवत 1998 मध्ये जनहित याचिका दाखल केली होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. त्याठिकाणी जोशींवर ताशेरे ओढले गेले. जोशींसारख्या उच्चशिक्षित मुख्यमंत्र्यानं फक्त जावयाच्या फायद्यासाठी एखाद्या शाळेच्या जागेचं आरक्षण बदलणं संतापजन असल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले होते. यामुळे मनोहर जोशींना (Manohar Joshi) मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंना त्यांच्या जागी मुख्यमंत्री केलं होतं.

अशोक चव्हाण यांनीही द्यावा लागला राजीनामा
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनाही सासरकडेच्या नातेवाईकांमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला. 2010 मध्ये आदर्श घोटाळा प्रकरण घडले. मुंबईतल्या प्रसिद्ध कुलाबा Colaba परिसरात लष्करासाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर रहिवासी इमारत उभारण्याची परवानगी दिल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. या इमारतीमध्ये अशोक चव्हाण यांच्या सासू भगवती शर्मा (Bhagwati Sharma) आणि सासरे मदनलाल शर्मा (Madanlal Sharma) यांच्या नावावर दोन फ्लॅट असल्याचं उघड झालं होतं. सोसायटीच्या फाईल्स क्लिअर करण्याच्या बदल्यात अशोक चव्हाण यांनी आदर्शमध्ये 3 बेनामी फ्लॅट मिळवल्याचा आरोप झाला होता. मीडियामध्ये हे प्रकरण खूप गाजल्यानंतर अशोक चव्हाण यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी