पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने(congress) तातडीनं जी 23(g-23) गटातील नेत्यांची बैठक बोलावली… त्या बैठकीत झालेल्या पराभवाचे मंथन करताना पक्षाला तातडीने पूर्णवेळ कार्यक्षम अध्यक्ष असावा अशी चर्चा करण्यात आली…त्यात सोनिया गांधी(sonia gandhi) यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद असावे असा निर्णय घेण्यात आला… पक्षाच्या वरिष्ठांनी यावर सकारात्मक भूमिका घेतली असली तरी पक्षाची देशभरात असलेली अवस्था पाहता आता नेतृत्वबदलाची गरज असल्याचे ठाम मत पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय… 2019 लोकसभेच्या(loksabha electon) निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव पाहता तत्कालीन अध्यक्ष राहूल गांघी यांनी जुलै 2019 मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.. त्यानंतर काही महिने पक्षाला अध्यक्ष नव्हता… त्यानंतर सोनिया गांधी(sonia gandhi) यांना हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी देण्यात आली.. तेव्हापासून त्यांच्याकडे जबाबदारी असली तरी पक्षाला अॅक्टीव्ह अध्यक्ष मिळाला नव्हता.. पाच राज्याच्या निवडणुका आणि त्यााधी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुका या पक्षाच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाच्या होत्या, पण पक्षाला या निवडणुकीत स्वतःला सिध्द करता आले नाही… त्यात पक्षाच्या असलेल्या जाागाही गेल्या… विधानसभा निवडणुकीत पंजाबसारखे(punjab) राज्य जे काँग्रेसकडे होते ते देखील हातून निसटून गेले… उत्तर प्रदेश निवडणुकीत तर पक्षाची पुरती दाणादाण उडाली… पक्षाची धुरा कोणाकडे आहे, याबाबतच पक्षात द्विधावस्था असल्याने निवडणुकीची रणधुमाळी असतानाही पक्षाच नियोजन नव्हते.. यात अनेक स्थानिक नेत्यांनी स्वतःची मनमर्जी केली, त्याचा मोठा फटका पक्षाला बसला… पक्षाच्या आत्ताच्या पराभवाची जबाबदारी सोनिया गांधी यांनी स्विकारली असली तरी खरे अपयश हे उर्वरीत नेत्यांचेच म्हणायला हवंय…2014 मध्ये भाजपाने सत्ता स्वतःकडे खेचून आणल्यानंतर काँग्रेसने स्वतःची रणनिती तयार करण्याची गरज होती.. पण संपूर्ण पक्ष केवळ पूर्व पुण्याईच्या कथेत रमला आणि पक्ष आणखीन गोत्यात गेला, हे आता स्पष्ट झालंय… देशातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष असलेल्या पक्षावर आता खऱ्या अर्थानं मरणावस्था आलीय… त्यासाठी पक्षाचे नेतेच जबाबदार आहेत… पण त्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही.. आत्ताच्या पराभवाची जबाबदारी स्वतः सोनिया गांधी यांनी घेतली असली तरी या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्या स्वतः सक्रीय नव्हत्या.. हंगामी अध्यक्ष म्हणून सर्वस्वी जबाबदारी त्यांची असली तरी देशातील महत्वाच्या राज्यांच्या निवडणुकीची रणनिती ठरवण्यात पक्षाचे अन्य नेते सपशेल अपयशी ठरलेत… देशभरातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेस पक्ष सिध्द करू शकले नाही… देशात सक्षम विरोधी पक्ष नाही म्हणनूच भाजापाचे मताधिक्य वाढतेय, असा सूर देशभरातील नेत्यांमध्ये आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये अधिक काळ हा कोरोनामय असला तरी जनहित्याच्या अनेक मुद्यांवर सरकारला ससंदीय आयुधांचा वापर करत अडचणीच आणणे काँग्रेसला शक्य झाले नाही… वाढती महागाई असो वा कोरोनाच्या पहिल्या लाटेतील वैद्यकीय असुविधा असोत, त्यात सरकारवर संसदीय अंकुश ठेवणे विरोधकांना सहज शक्य होतं…पण त्यात नेमकी कोणती रणनिती असायला हवी याचे नियोजन काँग्रेस पक्षाकडे अजिबात नव्हते… त्यामुळे भाजपाला पूर्ण मोकळीत मिळाली…याच भाजपाने सर्व गोष्टी चुकीच्याच केल्या असे म्हणता येणार नाही.. पण जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा याच भाजपाच्या नेत्यांनी पेट्रोल-डिझेल असो वा कांद्याची दरवाढ यावरून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे… इंधनदरवाढीवरून संसदेत बैलगाडीवरून स्वतः अटलबिहारी वाजपेयी आले होते.. आता मात्र इंधनाचे दर गगनाला भिडलेले असतानाही विरोधक म्हणून काँग्रेसला तो मुद्दा व्यवस्थित उचलता आला नाही… काँग्रेस पक्ष अशापध्दतीनं निपचित पडत चालला असेल तर मतदारांनी त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या का द्याव्यात हाही एक प्रश्न आहेच… काँग्रेस हा देशातील सर्वाधिक मोठा भ्रष्ट्राचारी पक्ष असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येतो… तसे पुरावेही भाजपाकडे आहेत.. गेल्या 70 वर्षात पक्षाने देशाला विकासापासून दूर नेले असाही राजकीय आरोप केला जातोय.. ही आरोपांची फटकेबाजी राजकीय असली तरी ती सत्य आहे, असे एक जागरूक नागरिक म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करता येणार नाही.. हा पक्षीय विचारधारेचा भाग असू शकतो… पण काँग्रेसच्या काळात काही कामे झाली नाहीत असे म्हणता येणार नाही… भाजपाच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय झाले हे खरे असले तरी त्यांच्या आधी जे सरकार होते, त्यांनी काहीच केले नाही, असे म्हणता येणार नाही.. तात्पर्य असे की भाजपाला स्वतःचा डंका मिरवता आला, जो अन्य पक्षांना जमला नाही वा आता जमत नाही.. पश्चिम बंगालमधील निवडणुका लक्षात घेता तेथे ममता बॅनर्जी यांनी त्यांचा विजय अक्षरशः खेचून आणला… तेथे तृणमूलचा 'खेला होबे' होताना भाजपाचच 'खेळ' झाला… त्यानंतर पुन्हा काँग्रेसप्रणित संपुआतील पक्ष एकत्र येणे आवश्यक होते… पण तसे झाले नाही त्याचा फटका आता पाच राज्याच्या मतमोजणीनंतर दिसून आला…. विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांची समिकरणे वगेळी असतात हे निर्विवाद असले तरी पक्षाची ताकद अशाच याच पद्दतीनं वाढवणं गरजेचं असतं एवढं साधं उत्तर काँग्रेस पक्षाच्या धुरिणांना माहित नसणं हे आश्चर्यकारक आहे… आता पराभवानंतर त्यावर मंथन करण्यानं काहीच हाती लागणार नाही… पक्षानं एकदा केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी अशा बैठका होणं आवश्यक असल्या तरी पुन्हा त्याच चुका होत असतील तर अशा राजकीय मंथनाला अर्थ उरत नाही… पाच राज्यातील पराभवांची दखल घेत पक्षाच्या जी 23 नेत्यांनी बैठक घेतली.. यात पक्षाच्या फसलेल्या नियोजनावर अधिक चर्चा अधिक होणं गरजेचं होतं.. तेथेही पक्षाचा अध्यक्ष कोण? यावर चर्चा झाली.. खरंतर पक्षाला सक्रिय अध्यक्षांची गरज असताना काँग्रेसच्या वरिष्ठांनी पुन्हा पक्षाध्यक्षपदाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे दिली आहे.. सोनिया गांधी या गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत.. त्यांना या पदाची दगदग सहन होणार नाही… हे माहित असतानाही केवळ गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणून स्वतःला सिध्द करत नेत्यांनी सोनियांच्या नावाला पाठिंबा देण्याचा प्रकार झाला, असे दिसून येते.. या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, काही लोकांच्या मते पराभवाला गांधी कुटुंबचं जबाबदार असल्याचे काही लोकांना वाटतेय. जर तुम्हा सर्वांना असेच वाटतेय तर पक्ष संघटनेसाठी आम्ही काहीही करायला तयार आहे. वेळ पडल्यास राजीनामाही देऊ. असं म्हणाल्याचं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय… मात्र, उपस्थित पक्षाच्या नेत्यांच्या आग्रहाखातर तूर्तास सोनिया गांधी यांच अंतरिम अध्यक्ष म्हणजेच दुसरा कोणी अध्यक्ष होत नाही तोवर त्या पदावर राहण्याचा निर्णय मान्य करण्यात आला… पक्षांतर्गत मतदान घेवून राहूल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असाही सूर यावेळी मांडण्यात आला… राहूल गांधी यांनी मागील गुजरात निवडणुकीत भाजपाला घाम फोडला होता… मात्र ती रणनिती त्यानंतर फारशी दिसली नाही… आता निपचित पडलेल्या काँग्रेसला पुन्हा नव्या उमेदीनं काम करायचं असेल तर नव्या विचारांचा आणि भाजपाच्या रणनितीला छेद देणारा अध्यक्ष आणण्याची खरी गरज आहे.. तोवर सोनिया हे नाव काँग्रेससाठी संजिवनी ठरलेलं आहेच…
-नरेंद्र कोठेकर