ब्लॉग

Doctors Day : स्वस्थ आरोग्यासाठी हे आहेत उपाय

हजारो डॉक्टर, नर्सेस आणि अन्य स्वास्थ्य कर्मचारी आणि संशोधक अथक प्रयत्न करीत आहेत. यामुळे लोकांचे जीव वाचवता येतील.

Published by : Team Lokshahi

-संत राजिन्दर सिंह जी महाराज

आजचा दिवस पूर्ण भारतवर्षात 'डॉक्टर-दिवस' म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरांची भूमिका आपल्या जीवनात प्रमुख आहे. जेणेकरून समाजात राहणाऱ्या लोकांच्या स्वास्थ्याची काळजी व्हावी. जर आपण शारीरिक दृष्ट्या आजारी पडलो तर एकदम आपल्या डोक्यात डॉक्टरांचा विचार येतो. कारण की आपण चांगल्याप्रकारे जाणतो की तेच आपल्याला स्वस्थ करू शकतील. म्हणून डॉक्टरी पेशा सन्माननीय आहे. त्यातसेवा आणि त्यागाची भावना असते.

सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीशी संघर्ष करीत आहे. जगभरातील हजारो डॉक्टर, नर्सेस आणि अन्य स्वास्थ्य कर्मचारी आणि संशोधक अथक प्रयत्न करीत आहेत. यामुळे लोकांचे जीव वाचवता येतील. अनेक कठीण प्रसंगात सुद्धा डॉक्टर्स आपले कार्य प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक करीत आहेत. ज्यामुळे लाखो लोकांना त्यांचे सहाय्य मिळत आहे.

चला तर, आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की डॉक्टर होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. विद्यार्थ्यांना अनेक वर्षे वैद्यकीय महाविद्यालयात चिकित्सा विज्ञान क्षेत्रासंबंधी प्रशिक्षण घ्यावे लागते. मानव शरीराचे प्रत्येक अंग, प्रत्येक औषधी अथवा प्रत्येक आजाराची लक्षणे लक्षात ठेवून, रुग्णावर योग्य प्रकारे उपचार करण्यासाठी, अनेक वर्षे कठोर अध्ययन करण्याची आवश्यकता असते, त्यासाठी तीव्र इच्छा असावी लागते. जो पर्यंत त्या क्षेत्रात निपुणता प्राप्त होत नाही तोपर्यंत आणि तदनंतर सुद्धा प्रशिक्षण इत्यादी मध्ये बराचसा कालावधी व्यतीत करावा लागतो.

डॉक्टर काय आहेत

जर आपण डॉक्टरांच्या जीवनाकडे पाहिले तर ते निष्काम सेवेचे ज्वलंत उदाहरण ठरते. ते आपला जास्तीत जास्त वेळ लोकांच्या आरोग्यासाठी देतात. स्वस्थ होण्याचा अर्थ म्हणजे आजारातून मुक्तता. आजारपण म्हणजे काय आहे? आजारपण म्हणजे बेचैनी असते. अनेक आजारांच्या कारणाने आपण स्वतःला शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ अनुभवतो. मानसिक दृष्ट्या आपण आपल्या व्यवसायातील समस्यां, घरगुती अडचणी तसेच सामाजिक दृष्ट्या त्रस्त होतो अथवा भावनिक पीडेमुळे सुद्धा आपण अस्वस्थ होतो. या सर्व कारणांमुळे बरेचसे लोक अध्यात्मिक दृष्ट्या स्वतःला ओळखू शकत नाहीत. त्यामुळे, ते त्रस्त असतात कारण त्यांच्या अंतरी आत्मा-परमात्मा, जीवनाचे ध्येय किंवा मृत्युनंतरच्या जीवना संबंधी अनेक प्रश्न निर्माण होतात. जोपर्यंत, आपल्याला म्हणजेच आपल्या आत्म्याला त्याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत बेचैनी राहाते. अशाप्रकारे आपण स्वतःला स्वस्थ राखण्यासाठी आपणास आपल्या शारीरिक, मानसिक, भावनात्मक दृष्ट्या तसेच आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा स्वस्थ राहावे लागेल.

आरोग्य का बिघडते

भौतिक शरीर स्वास्थ्यासंबंधी एक मनोरंजक म्हण आहे, स्वास्थ्य बिघडण्याची चार कारणे असतात. पहिले ill (आजारी पडणे), दुसरे pill (औषध सेवन करणे), तिसरे bill (पैसे खर्च करणे) आणि चौथे काही बाबींमध्ये will(वारसा हक्क लिहिणे). या बाबतीत संत राजिन्दर सिंह जी महाराज म्हणतात की, मी एक पर्याय जोडू इच्छितो तो म्हणजे still( स्थिर राहणे). चला तर, आपण स्थिर राहण्याकरीता ध्यान-अभ्यासाची कला शिकूया. कोणत्या प्रकारे आपले शरीर, मन, आपले भावजीवन, आत्मा आणि पूर्ण विश्वाला स्वस्थ करण्याची शक्ती ठेवू शकते हे जाणून घेऊया.

सध्याची चिकित्सा प्रणाली सुद्धा या निष्कर्षावर पोहोचली आहे की ध्यान-अभ्यास करण्याचे अनेक लाभ आहेत. याचा दररोज केला जाणारा अभ्यास अध्यात्मिक लाभ तर प्रदान करतोच त्याशिवाय या द्वारे आपल्याला शारीरिक, मानसिक व भावनात्मक रुपाने सुद्धा अनेक लाभ मिळतात. चिकित्सा क्षेत्रातील संशोधकांनी काही आजारांना आपल्या मानसिक आणि भावनात्मक अवस्थेशी जोडलेले आहे. खूप संशोधन केल्यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले आहेत की जेव्हा आपण मानसिक तणाव, भावनात्मक पीडा अथवा उदासीनतेच्या परिस्थितीत असतो, तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ति कमी होत जाते, या कारणाने आपण व्याधिग्रस्त होतो. डॉक्टर जॉन क्रेवन यांचे द्वारा केल्या गेलेल्या संशोधनानुसार, ध्यान-अभ्यास करणाऱ्या लोकांमध्ये तणावाचे प्रमाण फारच कमी दिसून आले. ध्यान-अभ्यासावर परीक्षण केले गेल्यानंतर आढळले आहे की, अशा तणावा संबंधीच्या व्याधी जसे की, उच्च रक्तचाप, अनिद्रा, दमा आणि छातीत धडधड होणे इत्यादींमध्ये सुधारणा होते.

बहुतांश चिकित्सा केंद्रात तसेच इस्पितळात तणाव कमी करण्यासाठी, काही व्याधींवर उपचार करण्याकरिता, आज-काल ध्यान अभ्यासाचे वर्ग भरवले जातात. ध्यान-अभ्यास आपल्या मनाला आणि आपल्या भावनात्मक अवस्थेला स्वस्थ करून, आपल्या शरीराला सुद्धा स्वस्थ करतो.

चिकित्सक आपल्या रुग्णावर उपचार करताना, त्यांना व्याधीमुक्त करण्यासाठी तसेच आपला उपचार प्रभावशाली करण्याकरिता ध्यान-अभ्यासाकरिता वेळ देण्याचा सल्ला देतात. ध्यान-अभ्यासाला दररोज काही वेळ दिल्याने त्यांचे रुग्ण एका अशा स्वास्थ्यदायक शक्ति च्या संपर्कात येतात, जी त्यांचे जीवन बदलून टाकते आणि त्यांना आराम आणि धैर्य प्रदान करते.

चला तर, आज आपण 'वैश्विक डॉक्टर्स डे' च्या दिवशी त्या सर्व लोकांचे धन्यवाद व्यक्त करूया जे आपल्याला स्वस्थ ठेवण्याकरिता अहोरात्र प्रयत्नशील आहेत.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...