संपूर्ण विश्वभरात दरवर्षी ८ जूनला ‘विश्व महासागर दिन’ साजरा केला जातो. समुद्राकडे पाहिले असता आपणास लक्षात येते की, महासागर फार विशाल आहे, तसेच फार खोल आहे. युगानुयुगे समुद्राचे पाणी पावसाच्या रूपाने धरतीवर येत आहे, ज्यामुळे प्राणीमात्रांना आणि मानवाला पिण्यासाठी ताजे पाणी मिळते. तसेच त्यामुळे झाडे-झुडपे फुलतात आणि फळतात.
विज्ञान आपणास शिकवते की, सूर्य किरणांच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफेचे रुपांतर ढगांच्या रूपात होतं. ढग जमिनीपासून खुप उंचावर जातात. जेव्हा या ढगांना थंड हवा लागते तेव्हा छोटे छोटे थेंब पावसाच्या रूपात आणि बर्फाच्या गारा होउन धरणीवर पडतात. यामुळे या भूस्तलावर रहाणाऱ्या जीवांचे पोषण होते.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लोक समुद्र किनारी (बीच वर) जाणे पसंत करतात. तिथे गेल्यामुळे आपण ताण-तणाव रहीत होतो आणि आपण आनंदी वातावरणात जातो. परंतु, जेव्हा आपण त्या वातावरणातून पुन्हा आपल्या घरी येतो, तेव्हा आपल्या जीवनाच्या अडचणी आणि ताण-तणावात पुन्हा घेरले जातो. संत महापुरुष आपल्याला समजवतात की आपल्या अंतरी सुद्धा एक प्रभूप्रेमाचा महासागर आहे. ज्यामध्ये वहाते प्रभूची प्रेम रुपी जल, जे आपल्या आत्म्याला शांत करते. जेव्हा आपला आत्मा शांति प्राप्त करतो, तेव्हा आपलं मन आणि शरीर सुद्धा स्वाभाविक रूपाने शांत होतात. ज्यामुळे आपण सदैव टिकून राहणाऱ्या परमानंदाच्या अवस्थेत पोहोचतो.
प्रभूप्रेमाचा समुद्र आपल्या अंतरी विद्यमान आहे. मग, आपण याच्यात का तरू नये? हे दुर्भाग्य आहे की आपण मनाच्या बरोबर तरंगत आहोत. मना बरोबर तरणं एक प्रकारे शार्क माशाच्या बरोबर तरण्यासारखे आहे. आपले मन नेहमी या जगातील भौतिक आकर्षणामध्ये गुंतवून ठेवते. जेणे करून आपल्या श्वासांची पुंजी नष्ट व्हावी. मनाबरोबर तरण्याऐवजी आपण प्रभूप्रेमाच्या सागरात तरले पाहिजे. याचा अर्थ असा की आपण ध्यान-अभ्यासाद्वारे आपले लक्ष बाह्य जगातून हटउन अंतर्मुख करावे आणि आपल्या अंतरी प्रभूच्या ज्योती आणि श्रुतींशी जोडले जावे. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपल्या अंतरी संतुष्टी प्राप्त होते. आपण प्रभू प्रेमाचा अनुभव करू लागतो. यामुळे आपण अधिकाधिक शांत होऊ लागतो. ज्या प्रमाणे पावसाच्या पाण्याचा थेंब महासागरात मिसळून त्याच्याशी एकरूप होतो आणि त्याचेच रूप बनतो. ठीक अशाच प्रकारे आपला आत्मा आपल्या अंतरी प्रभूप्रेमाच्या महासागरात डुबकी मारतो, तेव्हा तो प्रभूशी एकरूप होऊन प्रभूचेच रूप बनतो.
चला तर! जर आपणास सुद्धा प्रभुप्रेम रुपी आनंदाच्या या महासागरात डुबकी मारण्याची इच्छा असेल, तर आपण विद्यमान संत सद्गुरूंकडून ध्यान-अभ्यासाची विधी शिकून घ्यावी आणि तिला आपल्या दिनचर्येत सामील करून घ्यावे. जेणेकरून, आपण सुद्धा प्रेमाच्या या महासागरात रोज डुबकी मारून, प्रभूशी एकरूप होऊ या.