Sant Rajinder Singh Ji Maharaj Team Lokshahi
ब्लॉग

संत वाणी : सुख दुःखाना कसे सामोरे जावे?

नेहमी आपण पाहतो की, आपण सर्वजण जीवनामध्ये चढ-उताराचा सामना करतो. हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तो टाळता येत नाही.

Published by : Team Lokshahi

- संत राजिन्दर सिंह जी महाराज

नेहमी आपण पाहतो की, आपण सर्वजण जीवनामध्ये चढ-उताराचा सामना करतो. हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तो टाळता येत नाही. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण जीवन मार्गक्रमण करत असताना चढ-उतारांना सामोरे जातो, तेव्हा आपण आपल्या मनाची शांतता गमावून अस्थिर होऊ इच्छितो का? आपण आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमुळे स्वतःला प्रभावित होऊ दिले तर आपणास असे वाटेल की, जसे आपण प्रत्येक वेळी रोलर कोस्टर वर चाललो आहोत. म्हणजेच आपण आनंदाच्या अति उच्च शिखरावरून निराशेच्या खोल गर्तेत पोहोचु आणि मग पुढच्या क्षणी आनंदाच्या शिखरावर पुन्हा परत येऊ.

हा सततचा बदल अनेकदा भय, ताण आणि अशांती निर्माण करतो. कारण पुढे काय होईल, हे आपल्याला कधीच माहीत नसते? कालांतराने भीती व तणाव असलेली ही अवस्था आपल्या स्वभावाचा अविभाज्य भाग बनते आणि आपण शांत आणि तणाव मुक्त राहू शकत नाही.

जेव्हा कधी आपणास दुःख यातना होतील, तेव्हा आपण लक्षात ठेवावे की, This Too  Shall  Pass , "ही वेळही निघून जाईल". हे पाच शब्द आपणास संकटातून सहजपणे आणि विश्वास पूर्वक बाहेर येण्यास मदत करतील.

जेव्हा पुढील काळात आपण खूप आनंदी असू तेव्हाही आपण लक्षात ठेवावे की," ही वेळही निघून जाईल ". जेणेकरून या क्षणांचा आपण आनंद घेऊ शकू आणि ही वेळ गेल्यानंतर आपण उदास होता कामा नये, हे आपल्याला लक्षात आणून देतील की हा आनंदाचा क्षण नष्ट होईल आणि कष्टाचे दिवस येतील. परंतु ज्या प्रमाणे प्रत्येक काळोख्या रात्री नंतर सोनेरी सकाळ होते, त्या प्रमाणे अस्थाई सुख दुःख सोडून आपणास स्थायी शांती आणि परमानंदा कडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपण ध्यान अभ्यासाद्वारे प्रभू परमात्म्याच्या ज्योती व श्रुतीच्या संपर्कात येतो तेव्हा आपण स्थिर व शांत जीवन जगण्याची कला आत्मसात करतो. जीवनातील चढ-उतार म्हणजेच दुःखात उद्विग्न आणि सुखात घमेंडी स्वभाव आपल्यावर स्वार होता कामा नये. आणि आपण नेहमी, "This Too Shall pass " म्हणजेच “ही वेळही निघून जाईल” या तत्त्वानुसार आपले जीवन जगले पाहिजे.

हे आपणास लक्षात आणून देतील की आपण ध्यान-अभ्यासाद्वारे आपण आपल्या अंतरातील शांतीचा शोध घ्यावा, कारण तेच आपल्याला सदैव शांती प्रदान करेल.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत