Sant Rajinder Singh Ji Maharaj Team Lokshahi
ब्लॉग

संत वाणी : स्वतःशी प्रामाणिक रहा

सत्यता किंवा खरेपणा हा आत्म्याचा एक दिव्य गुण आहे.

Published by : Team Lokshahi

- संत राजिंदर सिंह जी महाराज

सत्यता किंवा खरेपणा हा आत्म्याचा एक दिव्य गुण आहे. तसे पाहिले तर आत्मा सत्याच्या मार्गावर चालतो परंतु मन धोकेबाजी व खोटेपणाचा खेळ खेळते. अध्यात्मिक उन्नतीकरिता आपल्याला आत्म्यास जाणावे लागेल. यासाठी आपणास सत्य हा सद्गुण धारण करावा लागेल.

आपण असे समजतो की, इतरांपासून स्वतःची कृती लपवू शकतो परंतु आपण परमात्म्या पासून आणि आपल्या आत्म्यापासून काहीच लपवू शकत नाही. आपणास आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते. प्रामाणिकपणा हा आत्म्याचा गुण आहे. ज्यावेळी आपल्याला निवड करायची असते की, आपण प्रामाणिक रहावे किंवा बेईमान बनावे, त्यावेळी आपण आत्म्याचे म्हणणे किंवा मनाचे म्हणणे ऐकू शकतो. मन आपणास बेइमानीकडे घेऊन जाते आणि त्यासाठी आपणास ते अनेक सबबी सांगते. याकरिता मनाकडे हजारो तर्क असतात की, आपणास खोटे का बोलायचे आहे, धोका का द्यावा किंवा चोरी का करावी परंतु आत्मा केवळ प्रामाणिकपणा जाणतो.

जर आपण अध्यात्मिक रुपाने प्रगती करू इच्छित असू तर आपणास आत्मिक रूपाला जास्तीत जास्त जाणले पाहिजे. आपल्या वास्तविक अवस्थेच्या जवळ येण्याकरिता म्हणजेच आपल्या आंतरिक आत्म्याच्या जवळ येण्याचा अर्थ आहे - आपण आपल्या कार्य व्यवहारात प्रामाणिक व्हावे. छोट्या-मोठ्या, खोटेपणाने व बेइमानी ने आपल्या अध्यात्मिक प्रगतीमध्ये अटकाव करणे योग्य आहे का? धोकेबाजी ने थोडे धन कमावून आपला आत्मा व परमात्म्याच्या मिलनात बाधा निर्माण करणे आणि आपल्या अंतरी जे अध्यात्मिक धन आहे त्यापासून वंचित रहाणे उचित आहे का? अंतरीचे खजिने शाश्वत आहेत आणि ते आपल्याबरोबर सदैव राहतात.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...