संकेत माने: आजच्या या टेक्नॉलॉजी या युगात तुमचं फेसबूक अकाउंट नसेल तर ते नवलच. आपल्यातील कित्येकजण फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शी परिचित असाल. दिवसातून किमान २-३ किंबहुना त्याहून अधिक वेळा देखील आपल्याकडून फेसबुक चा वापर होत असेल. अशावेळी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर करताना काय खबरदारी घ्यावी हे आज आपण या लेखातून जाणून घेऊयात.
1. अनोळखी लोकांची येणारी फ्रेंड रिक्वेस्ट:
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. अशावेळी जर तुम्हाला कोणत्या अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल, तर तुम्ही त्यांना पूर्वी कधी भेटलात का? त्यांना तुम्ही ओळखता का? संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय ती फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका. जर तुम्ही ती अक्सेप्ट केलीत तर तुमच्या प्रोफाईल चा संपूर्ण तपशील उदा: फोटो, व्हिडियो, कंटेंट इत्यादी पाहण्याची तुम्हाला मेसेज पाठवण्याची मुभा त्याला मिळते (Profile Lock हा ऑप्शन चालू असेल तरीसुद्धा Accept केल्याने ॲक्सेस दिला जातो). तुम्हाला देखील अशा रिक्वेस्ट नक्कीच आल्या असतील आणि तुम्ही जर त्या अक्सेप्ट केल्या असतील तर आजच तुमची फ्रेंड लिस्ट एकदा नक्की चेक करून घ्या!
2. पब्लिक पोस्ट वर काळजीपूर्वक कमेंट करा:
कोणत्याही ग्रुप अथवा पेज वर एखाद्या पोस्ट वर जर वापरकर्ता कोणतीही कमेंट करतो तेव्हा ती कमेंट फेसबुक वापरणारे सर्वजण पाहू शकतात. अशावेळी तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन देण्यास प्रवृत्त करणारी एखादी पोस्ट असेल (तुम्हाला १०,००० पगाराची नोकरी हवी आहे तर मोबाईल नंबर कमेंट करा इत्यादी) आणि जर तुम्ही तुमचा तपशील तिकडे कमेंट करून दिलात तर सर्वजण ते पाहू शकतात. यानंतर तुम्हाला खूप सारे मार्केटिंग चे किंवा ऑनलाईन Fraud करण्याऱ्या व्यक्तींचे कॉल्स येऊ शकतात.
3. प्रोफाईल लॉक आणि 2FA:
फेसबुक वर तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉक करता येते म्हणजेच तुमच्या फ्रेंड लिस्ट मधे असलेल्या लोकांनाच तुमच्या पोस्ट आणि इतर तपशील पाहता येतो. हा प्रोफाईल लॉक पर्याय तुम्हाला फेसबुक ॲप च्या सेटिंग्ज मधे सापडेल तो तुम्ही चालू करून घ्या त्याचप्रमाणे आपले अकाउंट हॅकर्स पासून सुरक्षित करण्यासाठी २afA enable करून घ्या.
4. फेसबुक वर दिसणाऱ्या ADS:
फेसबुक टाईम लाईन चेक करत असताना २-३ क्रमांकावर फेसबुक विविध कंपन्यानतर्फे लावण्यात आलेल्या ads युजर्स ना दाखवत असते. अशातच काही Fraud करणारे लोक तुम्हाला आकर्षित फोटो आणि कमी किंमत दाखवून ती वस्तू ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी युजर्स ला प्रवृत्त करतात. अशावेळी पडताळणी न करता जर आपण पेमेंट केले तर तुमच्यासोबत आर्थिक फ्रोड होऊ शकतो. तुम्ही दिलेल्या पर्सनल माहितीच्या आणि इंटरेस्ट च्या आधारावर या ads तुम्हाला दाखवल्या जातात. उदा: तुम्ही जर एखादी नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि त्या संबंधी माहिती ऑनलाईन तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला त्याच remarketing ads पाहायला मिळतील.
लेखक माहिती व तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत.