पीरियड्सच्या काळात प्रत्येक मुलीने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पीरियड्समध्ये तुम्ही तुमचे संपूर्ण शरीर निरोगी ठेवले पाहिजे. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला मासिक पाळी दरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया मासिक पाळी दरम्यान काय करू नये?
मासिक पाळी दरम्यान या गोष्टी करू नका-
योग्य वेळी पॅड न बदलणे
तुम्हाला माहित असेलच की मासिक पाळी दरम्यान पॅड वापरतात. पण पॅड कधी बदलावा हे कळायला हवं. जर तुम्ही एकच पॅड ज्यास्त वेळ वापरला तर तुम्हाला गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्ही योग्य वेळी पॅड बदलावा. एकच पॅड ४ तासांपेक्षा जास्त वेळ लावू नये.कारण पॅड जास्त वेळ लावल्याने ते रक्त शोषत नाही. त्यामुळे दिवसातून ३ वेळा पॅड बदला.
व्यायाम टाळू नका
मासिक पाळीच्या वेदनांमुळे थकवा येतो. अशा स्थितीत अनेकजण व्यायाम सोडून देतात. पण हे अजिबात करू नये. कारण व्यायाम केल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल आणि पीरियड्सचा त्रासही कमी होईल. पण फक्त हलका व्यायामच करावा हे लक्षात ठेवा.
मीठ खाऊ नका
मासिक पाळीत फुगण्याची समस्या असते. अशा स्थितीत पीरियड्समध्ये जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात अनेक आजार होतात. त्यामुळे खारट पदार्थांचा आहारात समावेश करू नका.
नाश्ता न करणे
मासिक पाळीच्या काळात आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडतं. त्यामुळे यावेळी शरीराला अधिक पोषणाची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही नाश्ता केलाच पाहिजे.