लाईफ स्टाइल

त्वचेवरचा कोरडेपणा कमी करायचा आहे? मग चेहऱ्याला लावा भेंडीचे पाणी फरक पाहून व्हाल थक्क!

भेंडी खाण्यासाठी जशी चांगली असते त्याचप्रमाणे भेंडीचे पाणी चेहऱ्याला लावण्याचे ही अनेक फायदे आहेत. भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यांसारखे घटक असतात.

Published by : Team Lokshahi

भेंडी खाण्यासाठी जशी चांगली असते त्याचप्रमाणे भेंडीचे पाणी चेहऱ्याला लावण्याचे ही अनेक फायदे आहेत. भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यांसारखे घटक असतात. जे चेहऱ्यावरील मुरुम, डाग कमी करून त्वचा हायड्रेट करतात. भेंडीमध्ये असणाऱ्या जेलीसारख्या पदार्थात अनेक पोषकतत्त्वांचा समावेश असतो. ते पोषकतत्त्व आपल्या निस्तेज त्वचेवर तेज आणतात. भेंडीमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी 6 हे गुणधर्म आढळतात, जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात:

कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्याने चेहऱ्यावर फोड्या आणि डाग येतात. भेंडीमुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच भेंडामध्ये असणारा जेलसारखा पदार्थ पाण्यात टाकून ते पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या नाहीशा होतात.

त्वचेवर येणाऱ्या मुरुम आणि डाग या समस्यांपासून सुटका देतात:

भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडंटचा समावेश असतो. जो यूव्ही किरणांच्या प्रभावापासून त्वचेचे संरक्षण करतात. यामुळे फंगल, बॅक्टेरियामुळे त्वचेवर होणाऱ्या पिंपल्सच्या समस्या दूर राहतात.

त्वचेवरील कोगडेपणा दूर करतात:

भेंडीमध्ये असणारे जीवनसत्त्वे त्वचेवरील कोगडेपणा दूर करून निस्तेज त्वचेवर चमक आणतो. त्वचा हायड्रेट करून चेहऱ्यावर नैसर्गिक तेज परत आणतो. तसेच चेहऱ्यावरील कोरडेपणा नाहीसा करतात.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती