जेवण करताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कधी कधी काही चुका होतात. कधीकधी भाजीत जास्त तेल टाकले जाते. यामुळे जेवणाचा स्वाद बिघडतो. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न पडतो. तो म्हणजे तेल कमी कसं करायचे. आज आम्ही तुम्हाला यावर काही टीप्स सांगणार आहोत.
भाजीत जास्त तेल झालं असेल तर त्यात उकडलेले बटाटे टाका. तुम्ही बटाटे उकळा आणि नॉन-स्टिक पॅनमध्ये हलके भाजून घ्या आणि कढीपत्तामध्ये मिक्स करून शिजू द्या. यानंतर हे बटाटे भाजीत टाकून कमीतकमी पाच मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि भाजी झाकून ठेवा.
रस्याच्या भाजीत तेल जास्त झाल्यास त्यात थोडे भाजलेले ब्रेड क्रंब्स टाका. हे लक्षात ठेवावे की ब्रेड क्रंब्स कोरडे भाजलेले असावेत.
भाजीतील अतिरिक्त तेल काढण्यासाठी तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. सर्वात प्रथम बर्फाचा एक मोठा तुकडा घ्या आणि त्याची एक बाजू तेलात बुडवा. यामुळे तेलाचा थर बर्फाला चिकटला जाईल
सुक्या भाजीत तेल जास्त झालं तर त्यात एक तर दाण्याचा कुट टाका किंवा मग थोडं बेसन टाकू शकता.