आजपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. यादरम्यान महिला दुर्गापूजेत सहभागी होतात. अशा परिस्थितीत महिलांना पारंपरिक पोशाख घालायला आवडते. तुम्ही लेहेंगा आणि चोली देखील घालू शकता. आपण लेहेंगा आणि चोलीचे कोणते डिझाइन कॅरी करू शकता ते जाणून घेऊया.
नवरात्रीत लाल रंगाचा लेहेंगा आणि चोली घालू शकता. लेहेंग्यावर गोटी पट्टीचे डिझाईन असेल तर छान दिसेल. या लहंग्यावर एम्ब्रॉयडरी ब्लाउज कॅरी करा. यानंतर तुम्ही केस मोकळे ठेवू शकता. मोठे कानातले घालू शकता.
जर तुम्हाला फ्लोरल प्रिंटचा लेहेंगा घालायचा असेल तर हा लूक खूरच छान दिसेल. हिरव्या रंगाच्या लेहेंगावर आरसे आणि तारे यांची नक्षी असूदे. या लेहेंग्यासोबत तुम्ही स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी करू शकता. लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही ऑक्साइड ज्वेलेरी घालू शकता.
निऑन ग्रीन कलरचा लेहेंगा तुमच्या लूकला खुलून दिसेल. या लेहेंग्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालू शकता. तसेच यावर हेवी ज्वेलरी कॅरी करु शकता.
निऑन ग्रीन आणि पिंक कलरमध्ये फ्लोरल आणि शेवरॉन प्रिंट असलेला लेहेंगा तुम्ही घालू शकता. केसांचा अंबाड्या बांधून त्यावर गजरा लावू शकता.