मोड आलेल्या कडधान्यात अनेक उपयुक्त घटक असतात जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित मोड आलेली कडधान्यांचा समावेश करा. मोड आलेले कडधान्ये खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. तर चला जाणून घेऊया.
तुम्हाला माहित असेल की काही कडधान्य पचायला हलकी असतात तर काही पचायला जड जातात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी त्यानंतर मूग आणि चवळी आहे. तसेच उडीद आणि हरभरा आणि पावटा हे आपल्याला पचायला सर्वात कठीण असतात.
कडधान्य खाल्ल्याने होणारे फायदे
मोड आलेली कडधान्य जास्त प्रमाणात जीवनसत्वे असतात. जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत.
‘क’ हे जीवनसत्वे मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात.
मोड आलेल्या धान्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात कडधान्याचा समावेश करा ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहिलं.
मोड आलेल्या कडधान्य हे पौष्टिक आहार असून त्यामुळे कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स होत नाहीत.
जर तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कडधान्य खाऊ शकता कारण त्यामध्ये कॅलरी कमी असतात.
अनेकांना भूक कमी लागते त्यामुळे तुम्हाला मोड आलेल्या कडधान्य खाण्याचा फायदाच होईल.