लाईफ स्टाइल

घामाच्या वासाने तुम्हीही हैराण आहात का? 'या' टिप्स वापरा, परफ्युमची गरजच पडणार नाही!

उन्हाळ्यात घामाचा वास येणे सामान्य आहे. परंतु, काहीवेळा ते लाजिरवाणे ठरते. घामाच्या वासाने त्रास होत असेल तर परफ्यूमऐवजी काही सोपे घरगुती उपाय अवलंबावे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Summer Sweating Tips : उन्हाळ्यात घामाचा वास येणे सामान्य आहे. परंतु, काहीवेळा ते लाजिरवाणे ठरते. अनेकदा लोक शरीरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी परफ्यूम वापरतात, परंतु ते महाग असण्यासोबतच शरीराला अनेक प्रकारे हानीही पोहोचवतात. जर तुम्हालाही घामाच्या वासाने त्रास होत असेल तर परफ्यूमऐवजी काही सोपे घरगुती उपाय अवलंबावे ज्यामुळे घामाचा वास दूर होईल आणि तुमच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.

टोमॅटो

तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेले लाल टोमॅटो तुमच्या घामाचा वास दूर करू शकतात. टोमॅटोचा रस काढा आणि तो तुमच्या अंडरआर्म्स आणि शरीराच्या त्या भागांवर लावा जिथे तुम्हाला जास्त घाम येतो. हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्याने तुमच्या घामाचा वास कमी होईल. टोमॅटोला अँटीसेप्टिक मानले जात असले तरी त्याच्या मदतीने दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि तुमच्या घामाचा वास येणे थांबते.

पुदीना

पुदीना उन्हाळ्यात त्याच्या ताजेतवाने गुणधर्मांमुळे प्रसिध्द आहे. त्याची पाने आंघोळीच्या पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने घामाचा वास दूर होतो. यामुळे तुम्हाला ताजेतवाने तर वाटेलच पण त्याच्या अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे घामाची दुर्गंधी तसेच त्यातील बॅक्टेरियाही दूर होतील.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा दुर्गंधी दूर करण्यासाठी ओळखला जातो. बेकिंग सोडा अंडरआर्म्सवर लावा, थोडा वेळ तसाच राहू द्या आणि नंतर ओल्या कपड्याने स्वच्छ करा. याशिवाय, तुम्ही बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून त्याचा स्प्रे देखील तयार करू शकता. अंडरआर्म्स आणि पाय इत्यादी घाम येणाऱ्या शरीराच्या अवयवांवर दिवसातून दोन ते तीन वेळा फवारणी करा आणि काही वेळाने धुवा. याच्या मदतीने काही दिवसात तुम्हाला दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

व्हिनेगर

अ‍ॅपल व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असल्यामुळे घामाच्या वासापासूनही सुटका मिळते. ते पाण्यात मिसळून घामाच्या भागावर पंधरा ते वीस मिनिटे लावा आणि नंतर धुवा. यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून लवकरच आराम मिळेल.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'माझा बुथ, सर्वात मजबूत' अभियान

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची आज नांदेडमध्ये सभा