हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. थंडीच्या दिवसात त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.. म्हणूनच, थंडी मध्ये कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे हिवाळ्यातही त्वचा कोरडी राहणार नाही
हिवाळा येताच त्वचेमध्ये कोरडेपणा, खाज सुटणे, कोरडेपणा यासारख्या समस्या येऊ लागतात, त्यामुळे त्याची काळजी घेणे खूप गरजेचे बनते. यासाठी अनेकजण केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण, यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. काहींना पिंपल्सचा त्रास होतो, तर काहींना त्वचेवर जळजळ होण्यास सुरुवात होते. म्हणूनच हिवाळ्यात पपई त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देते. मात्र, पपईचा नेमका कसा वापर करावा हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पपईमधील फ्लेव्होनॉइड्स कोलेजन तयार करण्यात मदत करतात, ज्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि पिंपल्स मुक्त राहते. याबरोबरच पपईमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि सुंदर ठेवण्यास मदत करतात.
कोरड्या त्वचेवर पपईचा फेस मास्क तुम्हाला या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतो. घरी फेस मास्क बनवण्यासाठी एक कप चिरलेली पपई घ्या आणि तिचे बारीक काप करा, त्यानंतर अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस त्यामध्ये घाला. अशा प्रकारे पपईचा नैसर्गिक फेस मास्क घरी तयार करा. हा मास्क चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावा, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्ती देतो आणि त्वचेला पोषण देतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. तुम्ही हा फेस मास्क आठवड्यातून दोनदा वापरू शकता.