Skin Care Tips  Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Skin Care Tips : काचेसारख्या त्वचेसाठी वापरा 'हे' पाच टीप्स

आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेच आहे.

Published by : shweta walge

प्रत्येकाला वाटत की आपण सुंदर दिसावे. त्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेच आहे. त्यासाठी त्वचा दिवसातून दोनदा स्वच्छ करणे अधिक महत्त्वाचे आहे. या सर्वामध्ये मेकअप आणि चेहऱ्यावरील घाण काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे. कामाच्या गडबडीमध्ये आपण त्वचेकडे जास्त लक्ष देवू शकत नाही. पण तुमच्या काही सवयींमध्ये बदल करुन तुम्ही काचेसारखी नितळ त्वचा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या सवयी.

भरपूर पाणी प्या

पाणी आपल्या शरीराला हायड्रेट करते. चांगल्या त्वचेसाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे दिवसभरात सुमारे 8 ग्लास पाणी प्या यामुळे अँटी-बॅक्टेरियल आहे.

लिंबूपाणी प्या

लिंबूपाणी सुपर हायड्रेटिंग आहे. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटू शकते. रोज सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्यायल्याने तुमची त्वचा स्वच्छ तर होईलच पण वजन कमी होण्यासही मदत होईल.

फेस मास्क लावा

नियमित फेस मास्क लावल्याने तुमची त्वचा नेहमी स्वच्छ राहते आणि ती ताजी ठेवण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा फेस मास्क लावू शकता. यामुळे तुमच्या मृतपेशी सुधारण्यास मदत होईल.

फेस स्क्रब

घाम येणे, घाण साचणे आणि दिनचर्येतील बदल यामुळे छिद्रे अडकू शकतात. एक चांगला फेस स्क्रब ही छिद्र साफ करण्यास मदत करू शकतो. यामुळे तुम्हाला मुरुम आणि सुरकुत्यापासून सुटका मिळेल.

फेशियल

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते त्याच प्रमाणे तुमच्या त्वचेलाही कोरड्या आणि निर्जीव त्वचेला सामोरे जाण्यासाठी हायड्रेशनची गरज आहे. हायड्रेक्योर फेशियल तु्म्ही करु शकता.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result