लाईफ स्टाइल

SEX करताना हार्ट अ‍टॅक तरुणाचा मृत्यू, अनेकांचं टेन्शन वाढलं; सविस्तर वाचा अन् चिंतामुक्त व्हा

Sex Education : याबद्दल अनेक समज आणि गैरसमज निर्माण झालेले आहेत. सविस्तर जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा.

Published by : Sudhir Kakde

नवी दिल्ली : आपल्या जोडीदारासोबत सेक्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने नागपूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमागे ह्रदयविकाराचा झटका हेच कारण असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आणि सेक्स यांच्यातील परस्परसंबंधाबद्दलचा मुद्दा समोर आला आहे. याबद्दल अनेक समज आणि गैरसमज निर्माण झालेले आहेत. सविस्तर जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा.

3. सेक्स दरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण किती आहे?

डॉ गुप्ता यांच्या मते, "लैंगिक क्रियाकलापादरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आठवड्यातून एकदा लैंगिक संबंध ठेवणाऱ्या प्रत्येक 10,000 लोकांपैकी फक्त 2 ते 3 जणांना हृदयविकाराचा झटका येतो." याव्यतिरिक्त, त्यांनी असंही सांगितलं की "तुमचं हृदय तंदुरुस्त असेल आणि कोणताही विकार नसेल तर, लैंगिक संभोगामुळे तुमच्या हृदयाची ऑक्सिजनची गरज वाढते आणि तुमचे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब दोन पायऱ्या चढल्याने वाढावेत तेवढे वाढतात. हे चिंताजनक नाही. तरीही डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.

4. सेक्सचे काही हृदयासाठी फायदे आहेत का?

डॉ गुप्ता यांच्या शब्दात, "लैंगिक क्रियाकलाप करताना तुम्ही अजिबात घाबरू नये, कारण सेक्समुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. आठवड्यातून किमान दोनदा सेक्स करणाऱ्या पुरुषांना आणि समाधानकारक लैंगिक जीवनाची जगणाऱ्या महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी आहे." पुढे ते असंही सांगतात की, सेक्सच्या फायद्यांविषयी बोलताना त्यांनी सांगितलं, "सेक्स हा व्यायामाचा एक प्रकार आहे आणि तुमचं हृदय मजबूत करण्यास, रक्तदाब कमी करण्यास, तणाव कमी करण्यास आणि झोप सुधारण्यास सेक्समुळे मदत होते. याशिवाय नातेसंबंधातील जवळीकता आणि त्रुणानुबंध वाढतात. सेक्समुळे नैराश्य दूर होतं, चिंता आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो."

सल्ला म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की, खालील पैकी हृदयाशी संबंधीत कोणताही त्रास तुम्हाला होत असेल तर सावध व्हा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.

1. छातीत दुखणे

2. श्वास लागणे

3. हात, मान आणि खांद्यामध्ये वेदना होणे.

4. मळमळ होणे.

5. भरपूर घाम येणे

6. चक्कर येणे

7. थकवा येणे.

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास

New Zealand Member Of Parliament: कोण आहे न्यूझीलंडची ती तरुण आक्रमक खासदार? जाणून घ्या...

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

Nana Patole On Mahayuti:अजित पवारांसह महायुतीवर पटोलेंचा निशाणा, भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप...