रोज केळी खल्लाने शरीराला अनेक फायदे होतात. केळ (Banana) हे असे फळ आहे जे चवीला गोड आणि हे फळ लहानमुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खायला आवडते.. मात्र कच्ची केळी खाण्यामागे अनेक फायदे आहेत. हिरवी म्हणजे कच्ची केळीमध्ये पोटॅशियम असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर चला जाणून घेऊया कच्ची केळी खाण्यामागचे फायदे.
केळी खाण्याचे फायदे :
हिरव्या केळीत कमी कॅलरी (Calorie) असतात, ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. कच्ची केळी खल्याने पोट दिवसभर भरलेले राहते आणि यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो.
कच्च्या केळामध्ये फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असते. जे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी कच्चं केळ खाणे फायदेशीर ठरते.
कच्च्या केळ्याचे रोज सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. याशिवाय कच्च्या केळ्यामुळे हाडं मजबूत बनण्यासही मदत होते.
कच्च्या केळामुळे भूख नियंत्रित राहण्यास मदत मिळते. त्यामुळे वेळी-अवेळी भूक लागणे कमी होते. भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी कच्ची केळीचे सेवन केले जाते.
ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास असतो त्या व्यक्तींना कच्ची केळीचे सेवन केल्याने ते फायदेशीर ठरू शकते. कच्ची केळी खाल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.