सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. लोकांना कन्फ्यूज करणारी, त्यातील रहस्य उलगडण्यात लोकांना चांगलीच मजा येते. म्हणूनच आज एक वेगळ्या धाटणीचा फोटो घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहून अनेक जण संभ्रमणात पडले आहेत.
या फोटोमध्ये किनारी वाळू असलेला समुद्र दिसत आहे आणि रात्रीच्या अंधारात समुद्राच्या लाटा दिसत आहेत पण या फोटोमध्ये तुम्हाला चुकीचे दिसत असेल पण हा फोटो समुद्राचा नाही.
हा फोटो Massimo या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सुरुवातीला तुम्हाला समुद्र किनारा, आभाळ आणि तारे दिसणार त्यानंतर …”
या फोटोवर युजर्सनी अनेक उत्तरे दिली आहेत. युजर्सच्या मते हा फोटो खूप संभ्रमित करणारा आहे. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर लिहितो, “मला फक्त समुद्र, समुद्रकिनारा दिसत आहे.”
नेमकं काय आहे फोटोमध्ये?
खोलवर विचार करायला लावणारा हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो आहे. या फोटोमध्ये कारचा खालील भाग दाखवला आहे. फोटोमध्ये कारचा दरवाजाही दिसत आहे.
आता तुम्हाला फोटोमध्ये खरंच कारचा दरवाजा दिसत आहे का की अजूनही समुद्रकिनारा दिसत आहे? जर तुम्हाला आताही समुद्रकिनारा दिसत असेल तर तुम्ही फोटोचे आणखी निरीक्षण करायला पाहिजे. सध्या हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.