सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. लोकांना कन्फ्यूज करणारी, त्यातील रहस्य उलगडण्यात लोकांना चांगलीच मजा येते. ऑप्टिकल भ्रम सोडवण्यासाठी निरीक्षण कौशल्य चांगलं लागतं. या चित्रांनी मेंदू चांगला चालतो म्हणजे हे चित्र सोडवताना मेंदूचा व्यायाम होतो. यामध्ये अनेक प्रकार येतात. यात कधी आपल्याला एखादी लपलेली वस्तू शोधायची असते तर कधी चुकीचं स्पेलिंग शोधायचं असतं तर कधी एखादी आकृती शोधायची असते. कधी कधी तर या किचकट चित्रांमध्ये चेहरा सुद्धा लपलेला असतो.
H शोधायचा आहे
हे चित्र नीट बघा, या चित्रात तुम्हाला खूप अक्षरं दिसतील यात तुम्हाला H शोधायचा आहे. कर्सिव्ह भाषेत हे लिहिलेलं आहे. तुमच्यापैकी काहीजण इंग्लिश मिडीयमला असतील तर त्यांना या भाषेत H कसा दिसतो हे माहित असावं. हे काय फार अवघड नाही. हे चित्र गोंधळून टाकणारं आहे. एक-एक अक्षर नीट पाहिलं तर कदाचित तुम्हाला याचं उत्तर लगेच दिसेल. उत्तर दिसलंय का?
जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर तुम्हाला याचं उत्तर दिसलं नसेल तर आम्ही सांगतो. वरून-खाली एक एक अक्षर बघत जा. डावीकडून उजवीकडे एक-एक अक्षर बघत जा या अक्षरांमध्ये H हे अक्षर सापडेल. हे अक्षर स्मॉल लेटर्स मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे H हे अक्षर h असं लिहिलेलं असेल. दिसलं? जर अजूनही तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर तुम्हाला तुमचं निरीक्षण चांगलं करण्याची गरज आहे. तुम्हाला सरावाची गरज आहे. काळजी करू नका, आम्ही याचं उत्तर खाली दाखवून देतोय.