मशरूम (Mushroom) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये अनेक महत्त्वाचे खनिजे आणि व्हिटॅमिन (Vitamins) आढळतात. मशरूमला आरोग्याच्या दृष्टीने रामबाण औषध मानले जाते. चवीष्ट असल्याने अनेकांना मशरूम खायला आवडते. भारतामधील अनेक भागांमध्ये मशरूमचे विविध प्रकार आढळतात. तसेच बाजारामध्ये मशरूम सहज उपलब्ध होतात. मशरूम चवीला जेवढे चविष्ट लागते तेवढीचं मशरूमची भाजीही खूप चविष्ठ लागते. भारतीय बाजारातपेठेत मशरूमच्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांना मशरूम खूप आवडतात. मशरूम जेवढे चवीला स्वदिष्ट आहे तेवढेचं ते आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तर चला जाणून घेऊया काय आहेत त्याचे फायदे.
मशरूम खाण्याचे फायदे :
मशरूमचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मशरूमच्या सेवनाने इतर फंगल इन्फेक्शन (Fungal infection) देखील बरे होण्यास मदत होते.
तसेच मशरूममध्ये हाय न्यूट्रियंट्स आणि अनेक प्रकारचे एन्झाइम्स असल्याने ते कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे मशरूमच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते.
मधुमेहाचा ज्यांना त्रास आहे त्याच्यासाठी मशरूम खूप फायदेशीर आहे. कारण मशरूममध्ये साखर अजिबात नसते. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी नियंत्रणास राखण्यास मदत करते.
मशरूमच्या सेवनामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी मदत होते. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते.
जर तुम्हाला ब्लड प्रेशर (Blood Pressure) सारख्या आजारांच्या समस्या असतील तर ते नियंत्रणास ठेवण्यासाठी मशरूमचे सेवन करू शकता.
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्याने शरीरातील वाढत्या वयाची लक्षणं दिसत नाही.