लाईफ स्टाइल

Almond Facepack: घरच्याघरी तयार करा बदामाचा फेसपेक; चेहऱ्यावरचे समस्या होतील दूर

Published by : Dhanshree Shintre

सुंरद त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन विविध उपचार घेत असतात. आपण घरगुती उपाय करून देखील आपली त्वचा सुंदर आणि मुलायम करू शकतो.

बदामाच्या तेलाचा वापर सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण बदामामध्ये अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, प्रोटीन्स, झिंक, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. बदाम भिजवून त्याची पेस्ट, बदामाचे तेल अथवा बदामाची पावडर सौंदर्य खुलवण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. बदामातील घटक त्वचेत मुरतात आणि त्वचेचं सौंदर्य वाढवतात. शिवाय बदामाच्या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. बदाम आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. आपण जर बदामाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला तर आपली त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते.

यासाठी 6-7 बदाम, गुलाब पाणी, मध आणि चंदन पावडर घ्या. हे सर्व साहित्य बारीक करुन घ्या आणि त्याची चांगली पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर साधारण 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा फेसपेक तुम्ही 8 दिवसातून एकदा तरी लावला पाहिजे. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करुन, रंग उडळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज करा. हळूहळू तुमचा चेहरा चमकेल आणि रंग उजळू लागेल.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News