लाईफ स्टाइल

उत्तराखंडच नाही तर महाराष्ट्रातही बघा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स! जाणून घ्या 'ह्या' ठिकाणाबद्दल...

महाराष्ट्र हे देखील फिरण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे, जिथे अनेक पर्याय आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की येथे फुलांची दरीदेखील आहे. होय, उत्तराखंडच नाही तर महाराष्ट्रातही येऊन तुम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहू शकता. चला जाणून घेऊया कुठे आहे हे ठिकाण आणि या भव्य ठिकाणी कसे पोहोचावे.

Published by : Team Lokshahi

उत्तराखंडमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ही एक अशी जागा आहे, जिथे जाण्याचे जवळपास प्रत्येक प्रवाशाचे स्वप्न असते, हे ठिकाण खूप सुंदर आहे. दूरवर पसरलेली रंगीबेरंगी फुले एकत्र पाहण्याचा दिलासा वेगळाच असतो. परंतु येथे फिरण्याचा हंगाम जुलै ते सप्टेंबर पर्यंतच असतो आणि त्या काळात अनेकवेळा हवामानही येथे फिरण्यात अडथळे निर्माण करू शकते. त्यामुळे अशाच काही कारणास्तव व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे प्लॅनिंग अद्याप करता आले नसेल तर टेन्शन घेऊ नका. कारण महाराष्ट्रातही फुलांची दरी आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले कास पठार. चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल सविस्तर.

कास पठार

साताऱ्यापासून २४ किमी अंतरावर वसलेले कास पठार हे महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. कास ही खरंतर फुलांची दरी आहे, तेथील दृश्य अतिशय सुंदर आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समुळे २०१२ मध्ये या ठिकाणाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीतही समावेश करण्यात आला होता. कास पठार १२०० मीटर उंचीवर आहे. पावसाळ्यात ही जागा फुलांच्या चादरीने झाकलेली असते. कास खोऱ्यात सुमारे ८५० प्रकारची फुले आढळतात. ज्यामध्ये गुलाबी रंगाची बालसम फुले पाहण्याची ही संधी आहे. याशिवाय पांढरा ऑर्किड, पिवळा सोनकी, स्मिटिया, सेरोफॅगिया अशी दुर्मिळ फुलेही येथे आहेत. ट्रेकिंग करताना दरीचे सुंदर दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात टिपण्याची संधी सोडू नका.

कास तलाव

कास सरोवराला कास तलाव असेही म्हणतात. जे येथे फिरण्यासाठी चांगले ठिकाण आहे. हा तलाव व्हॅली ऑफ फ्लॉवर्सजवळ आहे, त्यामुळे येथील हा तलाव पाहायला विसरू नका. हा तलाव संपूर्ण सातारा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतो. तसं पाहिलं तर पावसाळा हा तलाव पाहण्यासाठी सर्वात सुंदर काळ असतो.

कसे पोहोचायचे?

विमानाने : विमानाने येथे यायचे असेल तर सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे. पुणे विमानतळावरून बस किंवा टॅक्सीने कासला जाता येते.

रेल्वेने : रेल्वेने येण्यासाठी सातारा रेल्वे स्थानकावर यावे लागते. स्टेशन ते कास हे अंतर अवघे ३० किमी आहे. अंतरावर आहे. साताऱ्याला पोहोचल्यानंतर बस किंवा टॅक्सीने कास पठारावर पोहोचता येते.

रस्त्याने : रस्त्याने येथे यायचे असेल तर मुंबई किंवा पुण्याहून येथे पोहोचण्यासाठी ३ ते ५ तास लागू शकतात.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव