लाईफ स्टाइल

चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी किवी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

किवी हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे फळ चवीला आंबट असते. यामध्ये चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात, म्हणून याला सुपरफ्रूट असेही म्हणतात.

Published by : Siddhi Naringrekar

किवी हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे फळ चवीला आंबट असते. यामध्ये चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात, म्हणून याला सुपरफ्रूट असेही म्हणतात. किवीचा वापर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, रक्तदाब आणि डोळ्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी देखील केला जातो. हे व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम इत्यादींचा चांगला स्रोत आहे.

किवीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. याशिवाय त्वचेशी संबंधित सर्व समस्यांवर उपचार करण्यासाठी किवी तितकेच प्रभावी आहे. किवी तुमच्या त्वचेला पोषण देते. किवीमध्ये असलेल्या टी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे, किवी त्वचेवरील पुरळ, मुरुम आणि जळजळ कमी करून त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

किवी हे व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहे जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून तुमची त्वचा निरोगी आणि तरुण ठेवते. किवी खाल्ल्याने शरीरात कोलेजनचे उत्पादन उत्तेजित होते, ज्यामुळे आपली त्वचा लवचिक राहते.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती