लाईफ स्टाइल

न्यू ईअर नाईट पार्टीमध्ये बोल्ड आणि क्लासी लुकसाठी 'या' 5 ब्युटी टिप्स करा फॉलो

काही लोक क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात, तर काही लोक त्यांच्या घरी पार्टी आयोजित करून मजा करतात.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

New Year 2024 : जुने वर्ष अंतिम टप्प्याकडे जात असताना नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. काही लोक क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात, तर काही लोक त्यांच्या घरी पार्टी आयोजित करून मजा करतात. अशा परिस्थितीत मुलींना पार्टीला जाण्यासाठी खास वेषभूषा करायची असते. ड्रेस, शूज, मेकअप आणि हेअरस्टाइल यावर मुली विशेष लक्ष देतात. तुम्हालाही या नवीन वर्षात पार्टीत दमदार एन्ट्री करायची असेल, तर काही परफेक्ट मेकअप टिप्स तुम्हाला सांगणार आहोत

ग्लिटरी आय मेकअप

डोळ्यांचा मेकअप संपूर्ण लूक आणखी सुंदर बनवतात, म्हणून आम्ही तुम्हाला ग्लिटरी आय मेकअप टिप्सबद्दल सांगत आहोत जे पार्टीमध्ये परफेक्ट लूक देतील. तुम्ही तुमच्या डोळ्यांवर गोल्डम, सिल्वर किंवा क्रिस्टल सारख्या आयशॅडो लावू शकता. यामुळे तुमचे डोळे अधिक सुंदर बनवतील आणि तुमच्या चेहऱ्याची चमक देखील वाढवतील.

रेड लिप कलर

तुम्ही पार्टीमध्ये रेड लिपस्टिक लावू शकता. त्यामुळे तुमचा लूक लगेच ग्लॅमरस होतो. नवीन वर्षाच्या पार्टीत रेड लिपस्टीकचा योग्य ठरेल. तुम्ही मॅट फिनिशसह लिपस्टिक निवडणे आवश्यक आहे जेणेकरून ते बराच काळ टिकेल. या प्रकारचा लुक तुम्हाला ग्लॅमरस आणि आकर्षक बनवेल.

विंग्ड आयलाइनर

विंग्ड आयलायनरमुळे तुमचे डोळे मोठे तर दिसतीलच पण ते खूप सुंदरही दिसतील. तुम्ही ते बोल्ड आणि ड्रामेटिक पद्धतीने लावू शकता. यामुळे तुमचा लूक वेगळा दिसेल.

हाईलाइटिंग

नवीन वर्षाच्या पार्टीसाठी तयार होत असताना, आपल्या चेहऱ्यावर थोडे हायलाइटिंग करा, यामुळे तुमचा संपूर्ण लुक बदलेल. यामुळे तुमचा मेकअप आणखी चमकेल.

परफेक्ट ब्लश

तुमच्या चेहऱ्यावर मॅचिंग लिप कलरचा ब्लश लावा. यामुळे तुम्हाला फ्रेश लुक मिळेल. यामुळे तुमचा मेकअप पूर्ण होईल आणि तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसाल.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result