लाईफ स्टाइल

तुम्हीही रोज कॉम्पॅक्ट पावडर लावतायं?फायद्यापेक्षा नुकसानच जास्त, जाणून घ्या

चेहरा परिपूर्ण बनवण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का ही कॉम्पॅक्ट पावडर रोज वापरल्यास किती हानिकारक ठरू शकते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Compact Powder : आपल्या सर्वांना सुंदर दिसायचे आहे यासाठी अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. आपला चेहरा परिपूर्ण बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन आणि कन्सीलर वापरतो जेणेकरून आपल्या त्वचेचा टोन एकसमान दिसतो. यानंतर, कॉम्पॅक्ट पावडर वापरल्याने चेहऱ्याचा पृष्ठभाग आणखी चमकदार बनतो. पण तुम्हाला माहित आहे का ही कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही रोज वापरल्यास किती हानिकारक ठरू शकते. जाणून घ्या कॉम्पॅक्ट पावडरमुळे काय परिणाम होतो?

कॉम्पॅक्ट पावडर का आहे हानिकारक?

तज्ज्ञांच्या मते, कॉम्पॅक्ट पावडर आणि टॅल्कम पावडरसारखी कॉस्मेटिक उत्पादने त्वचेसाठी खूप हानिकारक असतात. ही पावडर अतिशय बारीक असल्याने त्वचेच्या छिद्रांमध्ये घुसून ते पोर्स बंद करतात. त्यामुळे त्वचेमध्ये ऑक्सिजनची कमतरता होते आणि त्वचेच्या निरोगी पेशी नष्ट होऊ लागतात. यामुळे कॉम्पॅक्ट पावडरचा दीर्घकाळ वापर करणाऱ्यांची त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात.

कॅन्सरचा धोका

काही कॉम्पॅक्ट पावडरमध्ये एस्बेस्टोस आणि स्पास्टिससारखे घातक पदार्थ देखील असतात. यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. विशेषतः एस्बेस्टोस हे फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या कॅन्सरचे मुख्य कारण मानले जाते. अशा परिस्थितीत या पावडरचा वापर अत्यंत जपून करावा. ही पावडर खरेदी करताना त्यात एस्बेस्टोससारखे हानिकारक घटक नसतील याची विशेष काळजी घेतली पाहिजे. याच्या मदतीने आपण धोकादायक आजार टाळू शकतो.

त्वचा व्यवस्थित स्वच्छ करा

कॉम्पॅक्ट पावडर जास्त प्रमाणात वापरल्याने त्वचेची जळजळ, पुरळ आणि अॅलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही लोकांची त्वचा संवेदनशील असते आणि ती कॉम्पॅक्ट पावडरची रसायने सहन करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्याचा वापर थांबवावा. अनेकदा मेकअप काढताना कॉम्पॅक्ट पावडर नीट साफ करत नाहीत त्यामुळे त्वचेचे पोर्स बंद होतात आणि मुरुम यासारख्या समस्या उद्भवतात.

Maharashtra New CM Oath Ceremony Date | सत्तास्थापन लांबणीवर? Mahayuti

Rohit Pawar On Ram Shinde | अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Latest Marathi News Updates live: नव्या सरकारचा शपथविधी पुढच्या आठवड्यात?

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi

26/11 Terror Attack: देशाला हादरवणारा दिवस! नेमकं काय घडलं होत 26/11 ला?