1) आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवा
उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढणे. आहारातील सोडियम कमी केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि रक्तदाब ५ ते ६ मिमी कमी होऊ शकतो. सोडियमचे मर्यादित सेवन करा. यासाठी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी खावेत, अन्नावर मीठ टाकण्याऐवजी मसाले वापरावेत.
2) नियमित व्यायाम करा
आठवड्यातून 150 मिनिटे नियमित शारीरिक हालचाली केल्यास रक्तदाब 5-8 mm/Hg कमी होतो. तुम्ही व्यायाम थांबवल्यास, तुमचा रक्तदाब पुन्हा वाढेल. रक्तदाब कमी करण्यासाठी तुम्ही चालणे, सायकलिंग, पोहणे यासह नृत्य देखील करू शकता. वेट ट्रेनिंग देखील रक्तदाब कमी करण्यास मदत करते. म्हणून आठवड्यातून किमान दोन दिवस याचा सराव करण्याचा प्रयत्न करा.
3) संतुलित आहार घ्या
धान्य, फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांनी समृद्ध आहार घेतल्याने तुमचा रक्तदाब 11 मिमी एचजी पर्यंत कमी होऊ शकतो. तुमच्या खाण्याच्या सवयी बदलणे सोपे नाही. पण तुम्ही काय खाता, कसं खाता, कधी खाता याचं निरीक्षण केलं पाहिजे. तुमच्या आहारात पोटॅशियम वाढवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची सोडियम पातळी कमी होण्यास मदत होईल. भाज्या आणि फळे पोटॅशियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. तुम्ही त्यांचा आहारात नियमितपणे समावेश करू शकता.
4) धुम्रपान सोडा
तुम्ही जी सिगारेट ओढता ती संपल्यानंतर काही मिनिटे तुमचा रक्तदाब वाढतो. धूम्रपान सोडल्याने तुमचा रक्तदाब पुन्हा सामान्य होऊ शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. जे लोक धूम्रपान सोडतात ते धूम्रपान न सोडलेल्या लोकांपेक्षा जास्त काळ जगू शकतात.
5) ताण-तणाव कमी घ्या
अनेक गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आधी तुम्हाला कशामुळे तणाव जाणवत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग तो कमी करण्याचे मार्ग शोधा. जर तुम्ही तणावमुक्त राहू शकत नसाल, तर तुम्ही ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा. याशिवाय पुरेशी विश्रांती घेण्यासोबत तुमच्या आवडीच्या काही कामांसाठी वेळ काढा. दररोज काही मिनिटे शांतपणे बसणे आणि दीर्घ श्वास घेणे हा देखील तणाव कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे.