आजकाल लोकांचे केस लहान वयात पांढरे होत आहेत. यासाठी लोक अनेक उपाय करतात. याशिवाय अनेकांना कोंड्याची समस्याही भेडसावत आहे.
कढीपत्त्याच्या मदतीने केसांमधील कोंडा दूर करता येऊ शकतो. यासाठी दह्यात कढीपत्ता मिसळून लावा. तसेच खोबरेल तेलात कढीपत्ता उकळवा आणि त्यात मेथीदाणे टाका, त्यानंतर आठवड्यातून एकदा या तेलाने तुमच्या स्काल्पची मालिश करा आणि एक ते दीड तासांनी केस धुवा.
मूठभर कढीपत्ता बारीक करून त्यात २ चमचे दही मिसळा. १५ ते २० मिनिटे केसांना लावून ठेवा त्यानंतर केस धुवा. कढीपत्त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्याच्या मदतीने केसांमधील कोंडा दूर करता येऊ शकतो.
येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.