आपल्या सर्वांनाच माहित आहे की, हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे. कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या रोज आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा आणि निरोगी आरोग्य ठेवा. किमान दिवसातून एक तरी हिरवी भाजी आहारात असावी. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सहसा भाजी खाणे टाळतो. मात्र, अस करू नका.कारण हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरातील रक्त वाढविण्यासाठी खूप उपयुक्त असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मिळते.
पालक, मेथी, चवळी, शेपू अशा अनेक भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आढळतात. तसेच आपल्या डॉक्टरही हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणास ठेवण्यासाठीही मदत करत असते. हिरव्या भाज्यांमध्ये पोषक घटक असतात ज्यांचा फायदा आपल्या हृदयाला आणि डोळ्यांना होतो.
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. रोजच्या आहरात जर तुम्ही हिरव्या भाज्यांचा समावेश केलात तर तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता.
उत्तम आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्तामध्ये फळं, नारळाचे पाणी, ताक यांचा समावेश करा. आणि दुपारच्या जेवणात सलाड खा. विनातेल चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी प्या. रात्रीचे जेवण हलके असावे.