लाईफ स्टाइल

तुम्हालाही आवडत नाही मेथीची भाजी, मग 'हे' फायदे वाचाच रोज खाल

मेथीची भाजी अनेक लोक आवडीने खातात. तर काहींना या भाज्या आवडत नाही. पण, आज या लेखातील मेथीचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही रोज मेथीची भाजी खायला सुरुवात कराल.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

थंडीच्या ऋतुत पालक, मोहरी, मेथी, वाटाणे, कोबी, गाजर, बीट अशा हिरव्या भाज्या भरपूर असतात. मेथीची भाजी अनेक लोक आवडीने खातात. तर काहींना या भाज्या आवडत नाही. पण, आज या लेखातील मेथीचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही रोज मेथीची भाजी खायला सुरुवात कराल. मेथीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, जीवनसत्त्वे बी, सी (ए, बी, सी) आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात.

मेथी खाण्याचे फायदे

* जर तुम्ही शुगरच्या आजाराने त्रस्त असाल तर मेथीची भाजी नक्की खा. कारण अशा प्रकारे सेवन केल्याने शरीरात इन्सुलिनचे निर्मितीस चालना निळते.

* जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर मेथीच्या बिया खूपच फायदेशीर ठरतील. कारण त्यात ७५ टक्के विरघळणारे फायबर असते. यामुळे पोट भरलेले राहते. यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही.

* जर तुमचे केस खूप गळत असतील तर मेथी खाल्ल्याने ते बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात राहते. त्यामुळे केस दाट होतात. मोड आलेल्या मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटीन नावाचे अॅसिड असते जे केसांसाठी चांगले मानले जाते.

* जर तुम्हाला युरिक अ‍ॅसिडचा त्रास असेल. तर, जेवणात मेथीच्या भाजीचा समावेश करा. यामुळे शरीरातील युरिकची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...