लाईफ स्टाइल

मटारचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहे का? वजनही राहते नियंत्रणात

हिवाळा सुरू झाला की हिरव्या ताज्या बाजारामध्ये दिसू लागतात. त्यामध्ये जी जास्त बाजारात उपलब्ध भाजी असते ती म्हणजे हिरवे मटार.

Published by : shamal ghanekar

हिवाळा सुरू झाला की हिरव्या ताज्या बाजारामध्ये दिसू लागतात. त्यामध्ये जी जास्त बाजारात उपलब्ध भाजी असते ती म्हणजे हिरवे मटार. तसेच मटार खाताना जेवढे चविष्ठ असतात तेवढेच ते आपल्या चांगल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. मटारमध्ये फायबर, सोडियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट गुणधर्माचा समावेश असतो. तसेच व्हिटॅमिन सी, के, कॅल्शियम असे अनेक पोषक तत्व असतात ते आपल्याला अनेक अजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. मटार खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे होणार आहेत ते आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.

हिरव्या मटारमध्ये मॅग्नेशियम आढळतं, जे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

तुम्हाला वाढते वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात हिरवे वाटाण्याचा समावेश करू शकता. कारण हिरव्या मटारमध्ये फायबर असते. तसेच त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. जर तुम्ही मटारचे सेवन केलेत तर तुमचे पोट भरलेले राहते आणि लवकर भूकही लागत नाही. त्यामुळे वाढते वजन कमी होण्यास मदत होईल.

हिरव्या मटारमध्ये सेलेनियमचे गुणधर्म असतात. आणि आपल्याला होणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थंडीत मटारचे सेवन केले जाते. त्यामुळे सांधेदुखीच्या त्रासापासून तुम्हाला आराम मिळेल.

हाडांचं दुखणं दूर करण्‍यासाठी हिरवे वाटाणे खूप उपयोगी ठरू शकतात. हिरव्या मटारमध्ये कॅल्शियमच, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी आहे. ह्यातून हाडांना आवश्यक पोषक तत्त्वच मिळते. व्हिटॅमिन के हाडांशी संबंधित अनेक त्रासापासून तुमचं रक्षण करेल.

मटारमध्ये आपल्यासाठी आवश्‍यक खनिजे असतात जी डोळ्यांशी संबंधित अनेक आजार दूर ठेवू शकतात.

हिरवे वाटाणे पचन संस्था मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण मटारच्‍या आत फायबर असतं, जे पचनासाठी उपयुक्त आहे. मटारच्‍या आत आढळणारे अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म आणि गॅलेक्‍टोज ऑलिगोसॅकराइड असतात, जे पचनक्रिया सुदृढ करण्‍यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news