बहुतेक जणांच्या फोन कव्हरच्या मागे 10, 20, 50, 100, 500 च्या नोटा दिसतील. हा पैसा फोनच्या मागे पडून राहिला तर आणीबाणीच्या काळात कामी येईल, असे लोकांना वाटते. मात्र, दरम्यानच्या काळात ते विसरतात की असे करणे त्यांच्यासाठी किती धोकादायक आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चूक झालीच तर फक्त या नोटेमुळे तुमचा जीवही जाईल. फोनच्या मागील कव्हरमध्ये नोट ठेवणे धोकादायक का आहे ते तुम्हाला सांगणार आहोत.
उष्णता बाहेर पडत नाही
जेव्हा तुम्ही फोन जास्त वापरता तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की तो गरम होतो. फोन गरम होताच फोनची मागील बाजू तापू लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या फोन कव्हरच्या मागे एक नोट ठेवली असेल, तर फोनची उष्णता बाहेर पडत नाही आणि त्यामुळे त्याचा स्फोटही होऊ शकतो. यामुळे फोनला घट्ट कव्हर वापरू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण त्यामुळे फोनचा स्फोटही होऊ शकतो.
नोटांमधील रसायने प्राणघातक
नोटा कागदापासून बनवल्या जातात आणि त्यात अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. अशा परिस्थितीत, जेव्हा फोन गरम होतो आणि नोटेमुळे उष्णता बाहेर पडत नाही, तेव्हा त्याला आग लागण्याची शक्यता असते. नोटेमध्ये असलेल्या केमिकलमुळे आग लागण्याची शक्यता आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत, फोन कव्हरच्या मागे चुकूनही कोणत्याही प्रकारची नोट ठेवू नका. आणि फोनचे कव्हर अतिशय काळजीपूर्वक वापरा.