आपल्या आयुष्यात आणि आपल्या शरीरासाठी पाणी हा एक अविभाज्य भाग आहे. सतत पाणी पित राहावे. व डॉक्टरसुद्धा आपल्याला हेच सांगतात की, देखील दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र जेवताना सारखं पाणी पिणे आरोग्यासाठी धोक्याचे समजले जाते. जेवताना लगेच पाणी प्यायल्याने अॅसिडिटी, पोट फुगणे यासांरख्या आजारांना सामोरे जावे लागते.
पाणी पिण्याचे फायदे
योग्य वेळी पाणी प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
पचनक्रिया बरोबर आणि मजबूत राहते.
पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होणार नाही.
जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे
गॅसची समस्या
लठ्ठपणा
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणं
जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावे?
जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. अन्न पचायला आपल्याला 2 तास लागतात. लगेच पाणी पिल्याने पचनसंस्था बिघडते. ४५ ते ५० मिनिटांनंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.