लाईफ स्टाइल

दिनविशेष 13 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

Published by : shweta walge

Dinvishesh 13 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 13 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

जागतिक दयाळूपणा दिन

२०१३: हवाई - देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली.

२०१३: ४ वर्ल्ड ट्रेड सेंटर - अधिकृतपणे उघडले.

२०१२: सूर्यग्रहण - ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.

१९९५: मोझांबिक - देश पूर्वीच्या ब्रिटिश साम्राज्याचा भाग नसून सुद्धा राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये (कॉमन वेल्थ) सामील होणारे हे पहिला देश बनला.

१९९४: स्वीडन - देशाने युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

१९९१: कारेलिया प्रजासत्ताक - रशियाचे स्वायत्त प्रजासत्ताक स्थापन झाले.

१९७०: भोला चक्रीवादळ - या २४० किमी/तास (१५० mph) उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे बांगलादेशच्या गंगा डेल्टा प्रदेशात एका रात्रीत अंदाजे ५ लाख लोकांचे निधन. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती आहे.

१९४७: AK-47 असॉल्ट रायफल - सोव्हिएत युनियनने या पहिल्या योग्य असॉल्ट रायफलची निर्माती केली.

१९३१: शंकर रामचंद्र दाते - यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.

१९२७: हॉलंड बोगदा - न्यू जर्सीला न्यूयॉर्क शहराशी जोडणारा पहिला हडसन नदी वाहन बोगदा म्हणून वाहतुकीसाठी खुला झाला.

१९२१: अखिल भोर संस्थान प्रजा सभा - स्थापन.

१९१८: पहिले महायुद्ध - मित्र राष्ट्रांच्या सैन्याने ऑट्टोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल ताब्यात घेतली.

१९१७: पहिले महायुद्ध - मोंटे ग्रप्पाची पहिली लढाई: सुरुवात

१९१३: रवीन्द्रनाथ टागोर - यांना गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.

१८६४: ग्रीस - देशाने नवीन संविधान स्वीकारले.

१८५१: सिएटल, अमेरिका - शहराची सुरवात.

१८४१: जेम्स ब्रॅडी - यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.

आज यांचा जन्म

जागतिक दयाळूपणा दिन

१९६७: जूही चावला - भारतीय अभिनेत्री, मिस इंडिया १९८४

१९५४: स्कॉट मॅकनीली - सन मायक्रोसिस्टिम्सचे सहसंस्थापक

१९१७: गजानन मुक्तिबोध - भारतीय हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (निधन: ११ सप्टेंबर १९६४)

१९१७: वसंतदादा पाटील - महाराष्ट्राचे ६वे मुख्यमंत्री (निधन: १ मार्च १९८९)

१८९८: इस्कंदर मिर्झा - पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (निधन: १३ नोव्हेंबर १९६९)

१८७३: बॅ. मुकुंद जयकर - भारतीय कायदेपंडित आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (निधन: १० मार्च १९५९)

१८६५: लुई ब्रँडीस - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनणारे पहिले अमेरिकन ज्यू नागरिक (निधन: ५ ऑक्टोबर १९४१)

१८५५: गोविंद बल्लाळ देवल - भारतीय मराठी नाटककार (निधन: १४ जून १९१६)

१८५०: आर. एल. स्टीव्हनसन - इंग्लिश लेखक व कवी (निधन: ३ डिसेंबर १८९४)

१७८०: महाराजा रणजितसिंग - शिख राज्याचे संस्थापक (निधन: २७ जून १८३९)

आज यांची पुण्यतिथी

जागतिक दयाळूपणा दिन

२००४: एलेन फेअरक्लॉ - कॅनडा देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री (जन्म: २८ जानेवारी १९०५)

२००२: ऋषिकेश साहा - नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते

२००१: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी - भारतीय ज्येष्ठ लेखिका (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)

१९६९: इस्कंदर मिर्झा - पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १३ नोव्हेंबर १८९८)

१९५६: इंदुभूषण बॅनर्जी - भारतीय आधुनिक बंगाली इतिहासकार (जन्म: १ नोव्हेंबर १८९३)

१७४०: कृष्णदयार्णव - भारतीय प्राचीन मराठी कवी

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News