मधुमेह (Diabetes) आणि लठ्ठपणा या जगातल्या दोन अशा समस्या आहेत,ज्याचा बहुतांश लोकानां त्रास होतो.तर या दोन्ही आजारांचा थेट संबंध आपल्या खाण्यापिण्याशी आहे.पण जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले तर तुमची मधुमेहाची समस्या दूर होईल. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही रोट्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची मधुमेहाची समस्या दूर होईल. चला जाणून घेऊया.
ओट्स चपाती (Oats Chapati)-
वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओट्स (Oats) हे रामबाण औषध आहे.ओट्सपासून बनवलेली रोटी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.ओट्समध्ये आढळणारे बीटा ग्लुकन तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका कमी करते. एवढेच नाही तर ओट्स रोटीचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांपासूनही बचाव होतो.
नाचणी चपाती (Nachani chapati)-
नाचणीच्या (Nachani)पिठापासून बनवलेली रोटी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये पॉलिफेनॉल तसेच आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवते.