कॉफीचे भन्नाट फायदे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. कॉफी केसांसाठी फार फायदेशीर ठरते तसेच ती निद्रानाशासाठी देखील उपयुक्त ठरते. कामाच्या वेळेस किंवा मुलांना अभ्यास करताना जर झोप येत असेल आणि त्यामुळे कामात लक्ष लागत नसेल, तर पिण्यासाठी कॉफी दिली जाते यामुळे झोप नाहीशी होते आणि कामामध्ये लक्ष लागते. कॉफी जसे हे फायदे आहेत तसेच कॉफी चेहऱ्यासाठी देखील तितकीच फायदेशीर आहे.
कॉफी एक उत्तम एक्सफोलिएटर आहे. एक्सफोलिएशन म्हणजे त्वचेवरच्या मृत पेशी निघून जाणारी गोष्ट आणि कॉफी त्वचेवरच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत करते. त्वचा बरेचसे लोक चमकदार आणि मुलायम करण्यासाठी महागडे स्क्रब वापरता असं करण आत्ताच थांबवा आणि घरच्या घरी केवळ दोन गोष्टींनी तयार करा कॉफी स्क्रब. यासाठी तुम्हाला कॉफी पावडर आणि बदामाचे तेल हे साहित्य लागणार आहे.
कॉफी स्क्रब बनवण्याची कृती:
सर्वात आधी कॉफी पावडर घ्या आणि त्यात बदामाचे तेल मिक्स करा. यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून थोडावेळ चेहऱ्यावर मसाज करा चेहऱ्यावरून गोल असा हात फिसवा आणि यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी कॉफी स्क्रब चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्यावरून टॉवेल फिरवून चेहरा स्वच्छ पुसून घ्या आणि चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा यामुळे चेहरा मऊ होण्यास मदत होईल आणि अशा प्रकारे कॉफी स्क्रबचा वापर करून घरच्या घरी त्वचा चमकदार आणि मुलायम दिसू लागेल.