उन्हाळ्यात (heat) त्वेचेच्या अनेक समस्यांना आपल्याया सामोरे जावे लागते. तसेच चेहत्यावर मुरुम येणं, सनबर्न, टॅनिंग होणं अशा अनेक तक्रारी निर्माण होतात.
या उन्हाळ्याच्या दिवसात या समस्यांना थांबवण्यासाठी अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक (Cosmetic) उत्पादनांचा वापर केला जातो. त्यामुळे चेहऱ्यावर याचा वाईट परिणाम होतो.
तर यावर उपाय म्हणून दह्याचा (curd) वापर करणं हे उत्तम आहे. दह्याचा वापरामुळे मुरुम, डाग दूर होण्यास मदत होते. तसेच चेहरा तजेलदार दिसतो. तर नेमका दह्याचा वापर कसा करावा?
दह्याचा फेस पॅक (face mask )कसा बनवायचा?
दोन चमचे दही, अर्धा चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घ्या. हे सर्व एकत्र करून चांगले मिसळा. २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
फायदा
उन्हाळ्यात चेहऱ्यावर दही लावल्याने त्वचेतील मृत पेशी निघून जातात, त्यामुळे चेहऱ्याचा रंग स्वच्छ आणि त्वचा नितळ राहते.
उन्हाळ्यात दही लावल्याने चेहऱ्यावरील ओलावा बंद होण्यास मदत होते आणि त्वचा सामान्य होऊ लागते.
कॅल्शियम (Calcium ) आणि व्हिटॅमिन डी (vitamin d ) दह्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात.