एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावरुन त्याबद्दल समज वा गैरसमज बाळगू नये असे म्हटले जाते. कित्येक वेळा लोकांचे कपडे पाहून त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. याबाबतचा एक सोशल एक्सपेरिमेंट व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक भिकारी पोत्यामध्ये चिल्लर घेऊन घेऊन 'आयफोन 15' खरेदी करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसतंय, की एक व्यक्ती भिकाऱ्याच्या वेषात एका मोबाईल शॉपमध्ये जातो. या व्यक्तीच्या हातात असलेल्या पोत्यामध्ये भरपूर चिल्लर आहे. हा व्यक्ती नवीन लाँच झालेला आयफोन 15 आपल्याला विकत घ्यायचा असल्याचं दुकानदाराला सांगतो. या व्हिडिओमध्ये दुकानातील कर्मचारी चिल्लर मोजताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला 36 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
खरं तर तुम्ही एखाद्या मोबाईलच्या पॉश दुकानात आहात, आणि तिथे जर एखादा भिकारी आला तर? त्या भिकाऱ्याला कशा प्रकारची वागणूक मिळेल? याबाबतचाच प्रयोग एका व्यक्तीने केला आहे. 'एक्सपेरिमेंट किंग' या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
iPhone 15 सीरीजमधील टॉप मॉडेल iPhone 15 Pro Max याची भारतात किंमत तब्बल दोन लाख रुपये एवढी आहे. या व्यक्तीचा अवतार पाहून दुसऱ्या एखाद्या दुकानदाराने त्याला दुकानातून हाकलून दिलं असतं. मात्र, जोधपूरमधील हा दुकानदार असं करत नाही. हा दुकानदार या व्यक्तीकडून चिल्लरमध्ये पैसे स्वीकारतो, आणि त्याला हवा तो फोनही देतो.