लाईफ स्टाइल

Hair Fall Control : 'या' 5 सवयी सोडल्या तर पुन्हा केस गळणार नाही; आताच वाचा

काही सवयी सोडल्या तर केस गळण्याच्या समस्येवरही मात करता येते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Hair Fall Control : लहानपणी केस गळण्याची समस्या फारशी नसते, मात्र मोठे होत असताना अचानक केस गळणे इतके कसे वाढते? कारण आहे बदलत्या जीवनशैलीच्या सवयी. लहानपणी आपण केसांवर जास्त प्रयोग करत नाही, पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे हे प्रयोगही वाढत जातात. कधीकधी इतर कोणत्याही केस उत्पादनाचा वापर केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत काही सवयी सोडल्या तर केस गळण्याच्या समस्येवरही मात करता येते. यामुळे केसांचे आरोग्यही चांगले राहील आणि ते सुंदरही दिसतील.

केस घट्ट बांधणे

जर तुम्ही केसांची वेणी किंवा अंबाडा घट्ट बांधलात तर तुम्ही मोठी चूक करत आहात. केस घट्ट बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात आणि टाळूचे नुकसान होते. त्यामुळे केस गळायला लागतात. अशा परिस्थितीत केस तुटण्यापासून रोखण्यासाठी घट्ट केस बांधण्याची सवय सोडली पाहिजे.

केसांची हेअरस्टाईल

आजकाल विविध प्रकारचे हेअर स्टाइलिंग टूल्स बाजारात उपलब्ध आहेत. याचा वापर मुली मोठ्या प्रमाणात करतात. अधूनमधून केसांना स्टाईल करण्यात काही नुकसान नाही. परंतु, दररोज हेअरस्टाईलसाठी स्ट्रेंटनिंग, ड्रायर, हेअर स्प्रे यांसारख्या वस्तूंचा वापर केल्याने केसांचे अधिक नुकसान होते. यामुळे केस जळतात आणि कोरडे होतात.

केसांची साफसफाई न करणे

केसांच्या स्टाइलसाठी किंवा सामान्यतः केसांवर अनेक प्रकारचे हेअर प्रोडक्ट्स लावले जातात. यामुळे केसांवर घाण जमा होते. ही घाण साफ न केल्यास केस खराब होऊ लागतात. शॅम्पू केल्यावर घाण सहसा जात नाही. परंतु दही किंवा कॉफीने डोके स्वच्छ केल्याने ते कमी होते. यासाठी डँड्रफ शैम्पू देखील वापरता येऊ शकतात.

ओले केस विंचरणे

केस तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे ओले केस विंचरणे किंवा केस ओले असताना ओढणे किंवा बांधणे. केस ओले असतील तर त्याची मुळे कमजोर होतात. अशा परिस्थितीत कंगव्याने विंचरल्याने केस सहज तुटू लागतात.

पोषणाकडे दुर्लक्ष

केस तुटण्यास कारणीभूत असलेली आणखी एक वाईट सवय म्हणजे केसांच्या बाह्य काळजीवर आपण लक्ष केंद्रित करतो आणि अंतर्गत काळजीकडे दुर्लक्ष करतो. केसांना आतून पोषण आवश्यक असते. यासाठी अन्नामध्ये पौष्टिक गोष्टींचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news