Angarki Sankashti Chaturthi 2022 Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Angarki Sankashti Chaturthi 2022 : आज अंगारकी चतुर्थी; जाणून घ्या मूहूर्त, विधिवत पूजा आणि महत्व

आज अंगारकी चतुर्थी. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यातून दोनदा येते.

Published by : Siddhi Naringrekar

आज अंगारकी चतुर्थी. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यातून दोनदा येते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टी केल्याचे सुख मिळते. असे गणेश भक्तांची भावना असते. मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारकी चतुर्थी म्हणतात.

अंगारकी चतुर्थीचे शुभ मुहूर्त

चतुर्थी तिथी प्रारंभ : मंगळवार, 19 एप्रिल, संध्याकाळी 04:38 वाजता

चतुर्थी तिथी समप्ती : 20 एप्रिल बुधवारी दुपारी 01:54 वाजता

चंद्रोदयाची वेळ : 19 एप्रिल रात्री 09:50 वाजता

अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:54 ते दुपारी 12:46 वाजेपर्यंत

अंगारकी चतुर्थीची पूजा

अंगारकी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करावे, गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घ्यावे. यानंतर ‘ॐ गं गणपतये नम:’ मंत्राचा जप करावा.लाल रंगाचं वस्त्र अंथरुण गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा, गंगाजल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा, फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा, व लाल रंगांचं फूल, दुर्वा, जान्हवं, पानाचा विडा, लवंग, इलायची आणि गुळ, खोबरं ठेवा. त्यानंतर नारळ आणि प्रसादात 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. दिवा आणि उदबत्तीने गणपतीची विधीवत पूजा करुन आरती करा.

श्री गणेश मंत्र

गजाननं भूत गणादि सेवितं, कपित्थ जम्बू फल चारू भक्षणम्।

उमासुतं शोक विनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम्।।

अंगारकी चतुर्थी हे नाव नेमकं कसं पडलं?

अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते असे मानले जाते. गणेशाच्या या रूपाला 'संकटमोचन गणेश' म्हणतात. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते, त्यावर प्रसन्न होऊन गणरायाने जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल, असे वरदान दिले होते. त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतातअंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते असे मानले जाते. गणेशाच्या या रूपाला 'संकटमोचन गणेश' म्हणतात. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते, त्यावर प्रसन्न होऊन गणरायाने जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल, असे वरदान दिले होते. त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news