National Child Health Program : नॅशनल चिल्ड्रेन्स हेल्थ प्रोग्राम (RBSK) द्वारे हृदयातील छिद्र, पाठीवर गळू, वाकडा पाय तसेच टीबी यासह 44 आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. ही सुविधा नवजात बालकांपासून ते 19 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे. (44 diseases of children will treat free under national child health program)
योजनेंतर्गत 19 वर्षांपर्यंतच्या मुलांना जन्मजात आजारांसह इतर आजारांवर मोफत उपचार केले जातात. आत्तापर्यंत हृदयाला छिद्र, पाठीवर गळू, वाकडा पाय, जन्मजात मोतीबिंदू किंवा जन्मापासून ऐकू न येणे किंवा मुके यावर मोफत उपचार केले जात होते.
आता टीबी, फुफ्फुसाचा टीबी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता, मायक्रोसेफली, मॅक्रोसेफली, लॅप्रोसीवरही उपचार करता येतात. आता एकूण 44 प्रकारच्या आजारांवर उपचार करता येणार आहेत.
-टीबी
- फुफ्फुसाचा टीबी
- व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता
- मायक्रोसेफली
- मॅक्रोसेफली
- लॅप्रोसी