भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारने पुढचे 15 दिवस प्रत्येक सार्वजनिक ठिकाणांवर, ट्रॅफिक सिग्नलवर भारतरत्न लता मंगेशकर यांचे गाणे चालवण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये आज सोमवारी अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.