इनकम टॅक्स विभागानं पॅन आधारला लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 म्हणजेच आज असल्याची घोषणा केली आहे. आज लिंकसाठीचा शेवटचा दिवस असून हे काम तुम्ही आजच न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रीय होईल. इतकंच नाही तर आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंडही भरावा लागेल.
लिंक न केल्यास निष्क्रीय होणार पॅन
केंद्र सरकारने वित्त विधेयक 2021 च्या अंतर्गत प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये जोडलेला कलम 234 एच पास केला आहे. ते 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर झाले. कलम २44 एच नुसार जर आपण सरकारने दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत पॅनशी आधार जोडला लिंक केलं नाही तर तुमच्याकडून 1,000 रुपये दंड आकारला जाईल. सोबतच शेवटच्या तारखेपर्यंत आपण असे न केल्यास आपलं पॅन निष्क्रिय होईल.
यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावं लागेल. यानंतर 12 अंकी आधार नंबर लिहा आणि 10 अंकी पॅन नंबर लिहा. आता पहिल्या स्टेपमध्ये सांगितलेला मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.
तुमचं पॅन कार्ड निष्क्रीय झाल्यास तुम्ही ते पुन्हा अॅक्टिव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला एक मेसेज करावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन 12 अंकाचा PAN नंबर एन्टर केल्यानंतर स्पेस देऊन 10 अंकांचा आधार नंबर एन्टर करावा लागेल आणि 567678 किंवा 56161 या नंबरवर मेसेज करावा लागेल.
असं तपासा पॅन आधारसोबत लिंक आहे का –
तुम्ही SMS च्या माध्यमातूनही पॅन आधारसोबत लिंक आहे का हे पाहून शकता. यासाठी तुम्हाला 567678 किंवा 56161 या दोन्हीपैकी एका नंबरवर SMS करावा लागेल. तुम्हाला UIDPAN 12 अंकी आधार नंबर आणि 10 अंकी पॅन नंबर लिहून एसएमएस करावा लागेल.