आरोग्य मंत्रालनायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 442 लोकांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. तर 24 तासांत 1 लाख 94 हजार 720 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 60 हजार 405 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशभरात 9 लाख 55 हजार 319 कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. कोरोना सोबतच भारतात ओमिक्रोनचा धोका देखील वाढत आहे. ओमिक्रोनचे तब्बल ४,८६८ दिवसभरात आढळे. देशात सर्वात जास्त ओमिक्रोनचे रुग्ण दिल्लीमध्ये सापडले आहेत.
कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट होत असतानाच दुसरीकडे चिंता वाढवणारी एक बातमी आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron) रूग्णांच्या संखेत वाढ होत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 213 रूग्ण आढळले आहेत. यात देशाची राजधानी दिल्लीत 57 तर महाराष्ट्रात 54 रूग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 90 ओमायक्रॉनचे रूग्ण बरे झाले आहेत.